Home / आरोग्य / व्यायाम करायला वेळ नाही, पिऊन बघा हा ज्यूस, काही दिवसांतच दिसेल वजनात फर्क….!

व्यायाम करायला वेळ नाही, पिऊन बघा हा ज्यूस, काही दिवसांतच दिसेल वजनात फर्क….!

सध्याच्या चुकीच्या आहरामुळे आणि व्यायाम न केल्याने वाढते वजन आणि अति लठ्ठपणा याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लठ्ठपणामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वावर तर परिणाम होतोच, सोबतच संबंधित व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल यांसरखे अनेक गंभीर आजार दिसून येतात.

अशा परिस्थितीत, आरोग्य तज्ञ लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी अनेक उपाय सांगतात जसे की डाइट आणि विविध प्रकारचे व्यायाम.परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत व्यायाम करायला खुप लोकांकडे वेळ नसतो. त्यामुळे आज आम्ही आपल्यासाठी अशे ५ ड्रिंक्स(पेय) घेऊन आलो आहोत, जे घेतल्याने काही दिवसांतच तुम्ही सडपातळ व्हाल.

● ते ५ पेय पुढीलप्रमाणे :-
१) काकडी आणि लौकिचा रस :-
काकडी आणि लौकी या दोन्ही मध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते आणि फायबर अधिक प्रमाणात असतो. काकडीमध्ये ९०% पेक्षा अधिक पाण्याचे प्रमाण असते. यामुळे चरबी कमी होते. तसेच, लौकी च्या ज्यूसमध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत, म्हणजेच लठ्ठपणा कमी करण्यासाठीचे घटक आहे, जे वजन नियंत्रित करण्यात बऱ्याच अंशी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे याचे रस रोज प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

कलोंजी :- साधारणपणे कलौंजी मसाल्यांमध्ये वापरले जाते, परंतु यासोबतच याचे वापर वजन कमी करण्यासाठी देखील केले जाते आणि हे सिद्ध देखील झाले आहे की हे वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी आहे. वजन कमी करण्यासाठी कालोंजीचा वापर अनेक प्रकारे केला जातो. पण तुम्ही त्याचे ज्यूस देखील पिऊ शकता. यासाठी आपण कालोंजीला पाण्यात उकळून घ्यावे आणि त्याचे पाणी गाळून पिऊन घ्यावे. तहे केल्याने वजन खूप लवकर कमी होण्यास सुरुवात होईल.

सोयाबीनचे दुध :- सोया दुधात असलेले एल्केलॉइड्स नावाचे घटक जांघाभोवती असलेली चरबी जलद कमी करण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त मानले जाते.

हळदीचे पेय :- हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो. जर तुम्हाला देखील पोटाची चरबी कमी करायची असेल किंवा वजन लवकर कमी करायचे असेल तर यासाठी हळद नियमितपणे पाण्यात उकळून प्यावी.

आल्याचा चहा :- आले पाण्यात उकळून त्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि प्या, हे वजन करण्यास फार उपयोगी आहे. हे पेय दिवसातून दोन किंवा तीन वेळा प्यायल्याने वजन लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते. एका संशोधनानुसार जे लोक रोज अद्रकाचे सेवन करतात, त्यांचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी होते. त्यात उपस्थित घटक रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!