Home / आरोग्य / फक्त पाच रुपयात पांढरे केस करा काळे, केसांची लांबी देखील वाढेल.

फक्त पाच रुपयात पांढरे केस करा काळे, केसांची लांबी देखील वाढेल.

अनेकांना खूप कमी वयातच केसगळती होणे, केस पांढरे होणे, कोंडा होणे व टक्कल पडणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांचे कारण आहे केसांच्या मुळाशी इन्फेकशन होणे. आणि हेच इन्फेकशन होऊ नये अथवा झालेले इन्फेकशन पुर्णतः गायब होण्यासाठी आजचा हा घरगुती उपाय. या उपायांसाठी आपल्याला फक्त ५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. सर्वांना अगदी सहजपणे करता येईल, असा हा घरगुती आहे.

सामग्री-
१. कोरफड-
आपल्या सर्वांना कोरफडीचे एक औषधी वनस्पती म्हणून उपयोग ठाऊक आहेतच. आयुर्वेदामध्ये या कोरफडीच्या औषधी गुणांचे वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात. जर कोरफडीची पाने आपल्याला मिळाली नाही मेडिकलमध्ये रेडिमेड मिळणार आलोवेरा जेल घेतलं तरी चालेल. कोरफडीच्या पानांमधील जो गर आहे त्याचा पांढरा भाग आपल्याला घ्यायचा आहे. हा गर काढल्यानंतर आपण त्याचा मिक्सरच्या साहाय्याने रस तयार करून घ्यायचा आहे.

कोरफड केसांसाठी गुणकारी आहे. यामुळे केसगळती थांबते, कोंडा होत नाही तर केस काळे देखील राहतात. म्हणूनच बहुतेक वेळी केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये आपल्याला कोरफडीचा संबंध दिसून येतो. यामुळे केस मऊ, चमकदार आणि सिल्की होतात. आपल्याला तीन-चार चमचे कोरफडीचा रस घ्यायचा आहे.

२. Vitamin E Capsule (ई जीवनसत्त्वाच्या गोळ्या)-
व्हिटॅमिन इ आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आपल्याला ‘व्हिटॅमिन इ’ ची एक गोळी वापरायची आहे.

कृती-
१. एका वाटीमध्ये तीन- चार चमचे कोरफडीचा रस घ्या.
२. त्यामध्ये एक ‘व्हिटॅमिन इ’ ची गोळी टाका.
३. त्यानंतर हे व्यवस्थित एकत्रित करून घ्या.
४. हे मिश्रण एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवू शकता. हे मिश्रण आपल्याला ७-१० दिवस सतत वापरायचे आहे.

काय काळजी घ्याल?
१. हे मिश्रण लावताना आपल्याला ते केसांच्या मुळांशी लावायचे आहे जेणेकरून केसांच्या मुळाशी असलेले इन्फेकशन निघून जाईल.
२. केसांना हे औषध लावण्यापूर्वी आपले केस पाण्याने धुवून कोरडे केलेले असावेत.
३. केसांवर कुठल्याही प्रकारचे तेल लावलेले नसावे. ४. केसांवर धूळ साचलेली नसावी.

५. हे मिश्रण लावल्यानंतर आपल्याला एक तास केस तसेच ठेवायचे आहेत.
६. एक तासानंतर आपण साध्या पाण्याने केस धुवायचे आहेत.
७. केस धुताना तुम्ही तुमचा शाम्पू वापरू शकता.
८. हा उपाय आपल्याला सलग ७-१० दिवस किंवा दोन आठवडे करायचा आहे. एक
आठवड्यानंतर आपल्याला या उपायाचा प्रभाव नक्कीच दिसून येईल.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!