Home / आरोग्य / एकदा करून पाहा हा उपाय,जीवनात पुन्हा कधीही पोट साफ होण्यासाठी, पित्तासाठी, गॅससाठी तसेच अपचन साठी चूर्ण घ्यावे लागणार नाही.

एकदा करून पाहा हा उपाय,जीवनात पुन्हा कधीही पोट साफ होण्यासाठी, पित्तासाठी, गॅससाठी तसेच अपचन साठी चूर्ण घ्यावे लागणार नाही.

नियमित व भरपूर पाणी पिऊनही जर आपल्या शरीरातील उष्णता, पित्ताचा त्रास, पोट साफ होत नसेल किंवा सांधेदुखी असेल तर हा उपाय करून पहा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. पित्त झाल्यावर आपल्या शरीरात आपल्याला काही लक्षणे जाणवतात, यामध्ये भूक आणि तहान वाढते, केस लवकर पांढरे होतात आणि गळायला लागतात. बऱ्याच जणांना चक्कर आल्यासारखे होते, अर्धे डोके दुखते किंवा अचानक शरीरातील उष्णता वाढते.

यानेच थंड खावेसे वाटते, श्वासात दुर्गंधी जाणवते व घशात कोरड पडते. जेवणाची वेळ बदलल्यास मळमळ होते आणि रात्री लवकर झोप लागते किंवा अचानक झोप मोड होते. यानेच महिलांना मासिक पाळीच्या वेळी त्रास जाणवतो. उष्णतेचे मुख्य कारण आहे, मोठ्या प्रमाणात निर्जलीकरण आणि इलेक्ट्रॉलाईटचे असंतुलन.

यासर्व गोष्टींवर साधा उपाय आहे, पाणी पिणे. पाणी पिताना एक गोठ पाणी खाली बसून तोंडात ठेवा आणि नंतर पाणी प्या. यामुळे आपल्या तोंडातील लाळ पाण्यात पूर्ण मिसळून जाते. यामुळे शरीरातील वाढलेले ऍसिड कमी होतात व पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. शरीर थंड होते, उष्णता निघून जाते म्हणून पाणी पिताना बसूनच व तोंडाला ग्लास लावूनच पाणी प्यावे. पाण्यासोबत हा साधा व घरगुती उपाय केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात व कुठलेही चूर्ण, गोळ्या व औषधे खावी लागत नाहीत.

उपायासाठी लागणारे साहित्य-
१. डाळिंबाचे दाणे-
डाळिंबामुळे शरीरातील पित्त कमी होते, उष्णता कमी होते व शरीरातील साखरेची पातळी नियमित राहते. गर्भवती महिलांना रक्तात लोहाची कमतरता जाणवते व डाळिंब ही कमी पूर्ण करते. या डाळिंबाच्या दाण्यांचा मिक्सरच्या साहाय्याने रस तयार करायचा आहे.
२. साखर- जेवढ्या प्रमाणात डाळिंबाचा रस झाला आहे त्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे.

कृती-
१. एका कढईत डाळिंबाचा रस मंद आचेवर गरम करायला ठेवा. २. त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात साखर घाला. ३. रसाची चांगली तार येईपर्यंत त्याला हलवत राहा.
४. तार तयार झाल्यावर हे मिश्रण गॅसवरून खाली काढा.
५. थंड झाल्यावर हे मिश्रण काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा.

वापर-
ज्यावेळी आपल्या शरीरातील पित्त किंवा उष्णता वाढेल त्यावेळी आपल्याला हे मिश्रण एक चमचा घ्यायचे आहे.
नियमित पित्त आणि उष्णतेचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दररोज दोन चमचे हे मिश्रण घ्या. ज्यांना वारंवार कफ आणि खोकला आहे त्यांनी हे औषध लगेच वापरू नये.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!