Home / आरोग्य / पांढरे झालेले केस काळे करा या घरगुती आयुर्वेदिक पौराणिक उपायाने. एका रात्रीत केस काळे

पांढरे झालेले केस काळे करा या घरगुती आयुर्वेदिक पौराणिक उपायाने. एका रात्रीत केस काळे

वयानुसार केसांचे पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केसांना रंग देणाऱ्या मेलेनिनचे उत्पादन वयानुसार कमी होते आणि त्यामुळे केस पांढरे होण्याची प्रक्रिया सुरू होते. कमी वयात केस पांढरे होणे ही एक मोठी समस्या बनली आहे. हार्मोनल आणि पर्यावरणीय कारणांमुळे केस पांढरे होण्याची समस्या अगदी लहान वयातच सुरू होते. आनुवांशिक घटक, हायपोथायरॉईडीझम, प्रथिनां कमतरता, खनिजांची कमतरता, जीवनसत्त्वांची कमतरता, त्वचारोग, ताणतणाव, औषधांचा दुष्परिणाम या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरतात. महिला किंवा पुरुष दोघांनाही ही समस्या उद्भवते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला पित्ताचा म्हणजेच शरीराच्या उष्णतेचा त्रास होतो, तर हाच त्रास केस पांढरे होण्यास कारण ठरू शकतो.केस पांढरे झाल्यावर डाय, रासायनिक रंग वापरले जातात मात्र अगदी घरगुती उपायांनीदेखील केस काळे करता येऊ शकतात.

तांबे समृद्ध आहार-कधीकधी आहारात तांबे नसल्यामुळे केस पांढरे होण्यास सुरवात होते. आयुर्वेदानुसार तांबे युक्त आहार पांढर्‍या केसांसाठी चांगला असतो. च्या डॉ.मेधवी अग्रवाल यांनी सांगितलं की, शरीरात मेलेनिन तयार होण्यास तांबे महत्वाची भूमिका निभावते. मेलेनिन हे त्वचेच्या रंगासाठीच नाही तर केसांच्या रंगासाठी देखील आवश्यक आहे. मशरूम, काजू, तीळ, बदाम, डाळी, अॅवोकॅडो, मनुका, संपूर्ण धान्य, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या, मांस, काळी मिरी इत्यादींचा आहारात समावेश करा.

भृंगराज-भृंगराज केसांच्या वाढीस प्रोत्साहित करते आणि केस काळे, चमकदार बनवते. हे केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच मेंदू शांत राहण्यास मदत करते.

आवळा पावडर आणि नारळाचे तेल-एका भांड्यात 2 चमचे आवळा पावडर आणि 3 चमचे नारळाचे तेल घ्या आणि पावडर वितळेपर्यंत गरम करा. तेल थंड झाल्यावर केसांच्या मुळांवर लावून चांगली मालिश करा. रात्रभर आपल्या केसात ते राहू द्या. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!