Home / आरोग्य / तुमचे केस वाढत नसतील, या पाच रुपयांच्या वस्तूने तुमचे केस होतील लांब, दाट.

तुमचे केस वाढत नसतील, या पाच रुपयांच्या वस्तूने तुमचे केस होतील लांब, दाट.

आजच्या परिस्थितीला जर तुमचे केस वाढत नसतील, सतत गळत असतील किंवा वय होण्याआधीच पांढरे होत असतील, तर आजचा हा उपाय नक्कीच तुमच्यासाठी आहे. यामुळे तुमची केसगळती थांबेल व केस काळे , मजबूत व दाट होतील. आपण केसांची जेवढी चांगली काळजी घेऊ, केस तितकेच चांगले राहतात. त्यांची वाढ ही आपण करणाऱ्या उपायांवर अवलंबून असते.

सामग्री- १. नागिनीचे पान २. कडीपत्ता ३. काराळे (Black Cummins Seeds) ४. मेथीच्या बिया ५. खोबरेल तेल

प्रक्रिया-
१. एका कढईमध्ये ५०-७० मिली. खोबरेल तेल मंद आचेवर तापायला ठेवा.
२. तेल थोडस गरम झाल्यावर त्यामध्ये एक नागिनीचे पान बारीक तुकडे करून, कडीपत्ताची आठ ते दहा पाने (मोठी असल्यास त्यांचेही तुकडे करावे), एक चमचा काराळे आणि एक चमचा मेथीच्या बिया टाकून द्या.
३. कडीपत्ता व नागिणीची पाने पूर्ण तळुन येईपर्यंत किंवा ब्राउन रंग येईपर्यंत हे मिश्रण असेच कढईवर ठेवा.

४. सर्व गोष्टी तळून झाल्यावर हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या, अगदीच थंड होऊ देऊ नका. ५. त्यांनतर हे तेल गळणीच्या साहाय्याने गाळून घ्या.
६. हे तेल तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये ठेवू शकता. हे तेल आपण महिनाभरासाठी ठेवू शकतो. ७. लावायच्या वेळी, हे तेल तुम्ही थोडस गरम करून वापरू शकता.
८. तेल लावून झाल्यावर केसांना जाड दातांच्या कंगव्याने नीट करून घ्या.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!