Home / आरोग्य / गरम पाण्यात करा ही प्रक्रिया, पोट सपाट होईल, चरबी जळेल, वात, पित्त, गॅस सहज कमी होतील.

गरम पाण्यात करा ही प्रक्रिया, पोट सपाट होईल, चरबी जळेल, वात, पित्त, गॅस सहज कमी होतील.

पोट हे सर्व आजारांचे मूळ आहे. गरम पाणी यावर रामबाण उपाय आहे. पण या गरम पाण्यात आणखी काही पदार्थ टाकल्याने आपले पोटासंबंधी बहुतेक तक्रारी नाहीशा होतील. या पदार्थांनी आपल्या पोटात असलेले विषारी घटक अगदी सहज बाहेर पडून जातील. शरीरातील ताकद वाढते तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. आपण ज्यावेळी तेलकट, चमचमीत पदार्थ खातो, तेव्हा आपल्या शरीरात टॉक्सिन जमा होतात.

आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की, गरम पाणी पिल्याने शरीरातील वजन व्यवस्थित राहते. सांधेदुखी व अंगदुखीचा त्रास नाहीसा होतो तर अनेक माता बहिणींचा मासिक पाळीचा त्रास देखील कमी होतो. मेंदूच्या पेशी या गरम पाण्यामुळे अत्यंत सतर्क राहतात. गरम पाणी घेताच शरीराचे तापमान वाढते व घाम येतो. या घामामध्ये अनेक जीवजंतू शरीरातून निघून जातात.
(उपायांसाठी साहित्य – 1. पाणी 2. ओवा 3. काळेमीठ 4. जिरे 5. धने)

उपाय १ –
१. एक ग्लास गरम पाणी, ओवा आणि काळे मीठ घ्या.
२. अर्धा चमचा ओवा आणि एक दोन खडे काळे मीठ एका वाटीमध्ये घ्या.
३. ओवा आणि काळे मीठ यांना ठेचून अजून बारीक करून घ्या.
४. त्यानंतर हे मिश्रण एक ग्लास गरम पाण्यात टाका व त्यावर झाकण ठेवा.
५. १५ मिनिटांनी त्यावरील झाकण काढून टाका.
६. तयार झालेले मिश्रण गाळणीमधून गाळून घ्या आणि लगेच पिण्याचा प्रयत्न करा.

उपाय २ –
अगदी पहिल्या क्रमांकासारखीच कृती आपल्याला पुन्हा करायची आहे. फक्त ओवा वापरण्याऐवजी जिऱ्याचा वापर करायचा आहे. आणि तयार झालेले औषध सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सलग २१ दिवस प्यायचं आहे.

उपाय – ३
याठिकाणी आपल्याला कृती पाहिल्या उपायासारखीच करायची आहे. फक्त ओवा आणि जिरे यांच्या जागी धने किंवा धना पावडर घ्यायची आहे. धना अगदी बारीक केला की, ते १५ मिनिटं गरम पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्याला गाळून प्यावे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!