Home / आरोग्य / खाज खुजली किती वर्षाची असु द्या जुनी, दोन दिवसांमध्ये होईल सुट्टी !! आहे एक महत्त्वाचा उपाय…

खाज खुजली किती वर्षाची असु द्या जुनी, दोन दिवसांमध्ये होईल सुट्टी !! आहे एक महत्त्वाचा उपाय…

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा आपले शरीर भिजून जाते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या त्वचेवर आद्रता कमी झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ लागते आणि बहुतेक वेळा त्वचा विकार होण्याची शक्यता असते. या त्वचाविकारांवर जर आपण योग्य वेळी योग्य उपचार केले नाही तर भविष्यात गंभीर समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते. हा उपाय दूर करण्यासाठी आपण वेगवेगळी औषधे उपचार सुद्धा करत असतो परंतु बहुतेक वेळा औषधोपचार करून सुद्धा आपली खाज, खरुज, नायटा व अन्य त्वचा विकार दूर होत नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगण्यात आलेला आहे त्या उपायांबद्दल सांगणार आहोत चला तर मग जाणून घ्या त्याबद्दल..

बहुतेक वेळा ऋतूनुसार आपल्या शरीराचे तापमान सुद्धा बदलत असते आणि अनेकदा शरीराला घाम सुद्धा येत असतो. बहुतेक वेळा आपल्या शरीराची स्वच्छता न झाल्यामुळे घाम तसाच शरीराला चिकटून असतो आणि त्यानंतर या घामाचा परिणाम दुर्गंधी मध्ये होतो व आपल्याला वेगवेगळे त्वचा विकार होण्याची शक्यता सुद्धा असते जास्तीत जास्त त्वचा विकार अशा ठिकाणी होतात ज्या ठिकाणी आपण जास्त स्वच्छता करत नाही. हा उपाय करण्यासाठी आपण नवरत्न तेल वापरणार आहोत. नवरत्न तेल हे आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि या तेलामध्ये अनेक आयुर्वेदिक वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे.

हे तेल ज्या ठिकाणी आपल्याला खाज येते अशा ठिकाणी लावल्याने आपल्याला थंडावा मिळत असतो. बहुतेक वेळा खाज येत असलेली जागा अनेक वेळा खाजवली यामुळे तिकडे आग होऊ लागते परंतु आपण अशा प्रभावी जागेवर नवरत्न तेल लावल्यास आपल्याला थंडावा प्राप्त होतो.जेव्हा आपल्या शरीरावर खाज निर्माण होत असते तेव्हा आपल्याला काही पदार्थांचे सेवन सुद्धा टाळणे गरजेचे आहे म्हणजेच की काही आंबट वस्तु असतात आंबट पदार्थ आहेत चिंच, दही यासारख्या वस्तू आपल्या आहारामध्ये खायचा नाही यामुळे आपल्याला खाज जास्त निर्माण होते आणि कधी कधी येईल एलेर्जी यामुळे सर्दी खोकला सुद्धा निर्माण होऊ शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा नवरत्न तेल घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कापूर घ्यायचा आहे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपण पूजेमध्ये कापूरच्या वड्या वापरतो त्याच वड्या आपल्याला येथे सुद्धा वापरायचे आहेत.

कापुर मध्ये अँटी इनफ्ला मेंटरी गुणधर्म असल्याने आपल्या शरीरावर जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्यासाठी कापूर मदत करत असतो.कापूर आपल्याला वापरायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या बारीक वाटून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची पावडर बनू शकेल त्यानंतर आपल्याला तिसरा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे तुरटी. तुरटी सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे आणि तुरटी जंतुनाशक असल्याने आपल्या शरीरावरील जे काही विषाणू आहेत ते विषाणू दूर करण्यासाठी मदत करत असते. पूर्वीच्या काळी लोक पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करत असेल त्याच बरोबर अनेक ठिकाणी सलून मध्ये सुद्धा दाढी केल्यानंतर तुरटीचा उपयोग केला जातो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटी ची थोडीशी पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे तिन्ही पदार्थ नवरत्न मध्ये टाकायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला खाज खरुज आहे अशा ठिकाणी लावायचे आहे परंतु हे मिश्रण लावण्याआधी त्वचा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्या लावायचा आहे. हे मिश्रण लावल्यानंतर अर्धा ते एक तास तसेच ठेवायचे आहे.

त्यानंतर स्वच्छ धुवून टाकायचा आहे अशा पद्धतीने जर आपण आठवडाभर हा उपाय केला तरी आपल्या शरीरावर खाज आलेली आहे ती खाज पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे व कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल तर तो नष्ट होऊन जाणार आहे म्हणून आपले शरीर चांगले ठेवण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!