Home / आरोग्य / पार्टी मध्ये जाण्याआधी फेयर एंड लवलीमध्ये हा घरचा पदार्थ मिक्स करा, मिळवा चमकदार त्वचा..

पार्टी मध्ये जाण्याआधी फेयर एंड लवलीमध्ये हा घरचा पदार्थ मिक्स करा, मिळवा चमकदार त्वचा..

नमस्कार प्रिय वाचक हो,

पार्टीचा किंवा लग्नाचा विषय आला की पुरुष असो वा महिला मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे ड्रेसची निवड. परंतु पार्टीसाठी फक्त चांगला ड्रेस असणे पुरेसे नसून, आकर्षक मेकअप असणे देखील महत्त्वाचे आहे. मेकअप मुलीला आकर्षक ही बनवू शकते आणि तिचे सौंदर्य देखील खराब करू शकते. अशा परिस्थितीत मेकअप योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. मात्र, जर आपण मेकअपसाठी पार्लरमध्ये जात असाल तर त्याचा परिणाम आपल्या खिशावर पडतो.अशा परिस्थितीत स्त्रियांच्या या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही आपल्याला घरीच घरगुती उपाय करून चेहऱ्यावर चमक कशी आणावी हे सांगणार आहोत.

यासाठी लागणारी सामग्री :-
१)साखर :- साखरने चेहऱ्याला स्क्रब केल्यास त्वचेमधील डेड सेल निघुन जातात व यामुळे चेहरा चमकण्यास मदत होते.आपल्याला एक चमचा साखर लागेल.
२)नींबू:- नींबू मध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते.नींबू हे नेचरल ब्लीच चे काम करते.आपल्याला अर्ध्या नींबूचा रस लागेल.

३)फेयर एंड लवली पाऊच.
कृती :- एका बाउल मध्ये अर्ध्या नींबूचा रस, एक चमचा साखर आणि एक चमचा फेयर एंड लवली घ्या. यानंतर हे तिन्ही पदार्थ चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या.

आता हे तैयार झालेले पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावावे. लावल्यानंतर १०-१५ मिनिट तसेच थांबावे.त्यानंतर आधी कोरड्या कापडाने चेहरा पुसून घ्यावा. मग अजुन पांच मिनिट थांबुन पाण्याने चेहरा धुवून घ्या.हा उपाय आपल्याला आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून ३-४ वेळा करायचा आहे.
यामुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येईल,चेहऱ्यावरचे डाग निघुन जातील व पिगमेंटेशन ही संपून जातील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!