Home / आरोग्य / आयुष्यात असा उपाय पहिला नसेल, केस ना गळतील, ना तुटतील डॉक्टर सुद्धा हैराण..

आयुष्यात असा उपाय पहिला नसेल, केस ना गळतील, ना तुटतील डॉक्टर सुद्धा हैराण..

नमस्कार प्रिय वाचक हो,

मित्रांनो, जर तुमचे केस खूपच तुटत असतील, गळत असतील आणि खूप औषधोपचार करूनही तुम्हाला जर काही फायदा होत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमची केस गळती कमी होईल. हा उपाय महिला व पुरुष दोघेही वापरू शकता.

साहित्य-
१. कडीपत्ताच्या बिया- शक्यतो पिकलेल्या बिया घ्याव्यात, ज्यांचा रंग जांभळा झाला असेल. यामध्ये पोषक तत्वे जास्त असतात. यामधून निघणारे नच्युरल ऑइलमूळे केस गळती तर थांबतेच तसेच केसांची मुळे देखील मजबूत होतात.
२. कडीपत्ताची पाने (१०-१५).

३. नारळ तेल/ बदाम तेल किंवा तिळाचं तेल- तेलामुळे त्वचा मुलायम होतेच तर केसांमधील मृत पेशी सुद्धा निघून जातात.

(टीप- कडीपत्ताच्या बिया मिळाल्या नाहीत तर त्याठिकाणी आपण कडीपत्ताची कोवळी पाने देखील घेऊ शकतो).

कृती-
१. वरील दिलेल्या तेलांपैकी कुठलेही एक तेल १०० मिली. एका बाटलीमध्ये घ्या.
२. तेलामध्ये ६-७ कडीपत्ताच्या बिया व १०-१२ कडीपत्ताची कोवळी पाने टाका.

३. या सगळ्या वस्तू टाकल्यावर, तेलाची बाटली पाच ते सहा दिवस सूर्यप्रकाशात ठेऊन द्या. जेणेकरून कडीपत्ताच्या बिया आणि पानांमधील पोषक तत्वे तेलामध्ये येतील.
४. पाच ते सहा दिवस तेल उन्हात ठेवल्यानंतर ते गाळून घ्यावे.

कडीपत्तामध्ये Vit.B आणि अँटी ऑक्सिडंट असतात. त्याचबरोबर यामध्ये वेगवेगळे पिगमेंट देखील असतात ज्याने केसाना काळा रंग देखील येतो.

वापर-
दररोज ज्याप्रकारे आपण डोक्याला तेल लावतो, त्याचप्रकारे या तेलाचा देखील वापर करायचा आहे. केसांना लावून झाल्यावर तुम्ही या तेलाने मालिश देखील करू शकता.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!