Home / Motivation / गरीब मुलाला मदत व्हावी म्हणून मदत केली पण त्याने त्या मदतीचे जे केले ते पाहून धक्का बसेल..

गरीब मुलाला मदत व्हावी म्हणून मदत केली पण त्याने त्या मदतीचे जे केले ते पाहून धक्का बसेल..

शाळेने पत्र काढले यां पत्रकामध्ये लिहिले की, शाळेतील सर्वात गरीब विद्यार्थ्याला मदत करायचे आहे यासाठी आपल्याला अचूक विद्यार्थी निवडायचा आहे जेणेकरून त्या विद्यार्थी-विद्यार्थिनी ला मदत योग्यरित्या पोहोचू शकेल व त्या मदतीचा लाभ सुद्धा मिळू शकेल. सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे पंचाईत होते.

शाळेत शिकणारी मुलं खूप लहान लहान परंतु घरची परिस्थिती एवढी वाईट ही आज घातलेल्या सदरा घरी गेल्यावर स्वच्छपणे बघून नेटका करून पुन्हा उद्या सकाळी शाळेत घालून येत असे. अशावेळी गरीब मुलगा शोधायचा तरी कसा ? आणि विचार तरी कसा करायचा असा प्रश्न शाळेतील शिक्षकांना पडू लागला. तीन-चार दिवस अंदाज बांधण्यात गेला. वयाने मोठ्या असणार्‍या व्यक्तींमध्ये गरीब व्यक्ती शोधणे सोपे आहे पण लहान मुलांमध्ये गरीब व्यक्ती शोधणे अत्यंत कठीण होऊन बसते. शेवटी काही मुलांना हाताशी घेतले. जी मुले गाडीने घरी जायची आणि गाडीने शाळेत यायची. मधल्या सुट्टीत वर्गात अचानक आलो तर ती मुले सफरचंद खाताना दिसायची.
अशावेळी मुलांना मी आपल्या वर्गातील सर्वात गरीब मुलगा कोण आहे याबद्दल विचारता मुलं मोकळी होईल बोलू लागलेत त्यांनी क्षणाचाही विचार न करता मयूर चे नाव घेतले. त्यांनी म्हटले की सर मयूर आपल्या वर्गातील सर्वात गरीब मुलगा आहे,त्याच्या शर्टावर अनेक ठिकाणी ठिगळे आहेत तो तसेच फाटलेला शर्ट शिवून शाळेमध्ये येत असतो त्याची पॅंट सुद्धा पाठून फाटलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन ठिगळे लावून घालून येतो.

आम्ही सगळे दुपारी वर्गात डब्बा खात असतो .तेव्हा तो वर्गाच्या बाहेर जाऊन हातातल्या प्लास्टिकच्या पिशवी मधून भाकरीचा तुकडा काढतो.भाजी कसली भाकर सोबत गुळ खातो आणि ही भाकर सुद्धा आधीच्या दिवशी म्हणजेच रात्रीची असते त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यालाच खरी मदत पोहोचायला हवी असे मुलांनी सांगितले. सरांना मयूर बद्दल अजिबात कल्पना नव्हती. मुलं त्याच्या बद्दल व त्याच्या गरीबी बद्दल वेगवेगळे दाखले देत होते.हे सर्व ऐक ना सरांना शक्य नव्हतं.

सरांना कल्पनासुद्धा नव्हती की मयूर हा वर्गातील सर्वात गरीब विद्यार्थी आहे कारण की मयूर हा वर्गातील सर्वात चपळ हुशार विद्यार्थी आहे. त्याचे अक्षर मोत्यासारखे होते. त्याचे निर्मळ मन त्या मोत्यांना चमकवत असे आणि क्षणांमध्ये मुलांनी वर्गातील गरीब विद्यार्थ्यांचा प्रश्न सहज रित्या सोडवून टाकला. घरी गेल्यावर सरांनी त्याचे अक्षर असलेले पत्रक आपल्या पत्नीला दाखवले आणि सांगितले की हे बघ असे मोत्यासारखे अक्षर असावे असे माझे स्वप्न असायचे .हे जे पत्रक आहे ते इयत्ता सातवी अ मधील मयूर या विद्यार्थ्यांचे आहे. मनाने निर्मळ आहे त्याची आज परिस्थिती मला कळाली तो परिस्थितीने गरीब आहे परंतु मला याची जाणीव कधी झाली नाही.

वर्गात कोणतेही काम असेल त्याचा उत्साह द्विगुणित असायचा. सर्वांच्या पुढे असायचा. अनेकदा वहीचे गठ्ठे उचलण्यासाठी सुद्धा पुढे असायचा.गेल्या वर्षी तो सहलीला आला नाही फक्त पंचवीस रुपये एवढी होती परंतु मुलांच्या किलबिलाटात त्याची साधी मला आठवण आली नाही त्याची परिस्थितीमुळे पंचवीस रुपये देणे शक्य होत नाहीये ,हे मला कळले नाही.मी साधी विचारपूस केली नाही कारण काय आहे एक सुंदर अनुभव घेण्यासाठी मुकला.आज मला या सगळ्या गोष्टींची खंत वाटत आहे कारण की एवढ्या जवळ असून सुद्धा मला घरच्या परिस्थितीची जाणीव झाली नाही.

दुसऱ्यादिवशी सरांनी मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये गेल्यावर मयूरचे नाव सुचवले. इयत्ता सातवी अ विद्यार्थ्याचे नाव मयूर असे कळताच मुख्याध्यापकांनी चष्मा फिरवत सरांना विचारले चौकशी नीट केली ना कारण की जी रक्कम मिळणार आहेत या रकमेमुळे विद्यार्थ्याचे वर्षभराची फी शिक्षणाचे साहित्य गणवेश या सर्वांचा समावेश त्या रकमेएवढे असणार आहे. सरांनी कशाचाही विलंब न करता होकार दिला. दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये गरीब विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्याचे ठरवण्यात आले वर्गावर गेल्यावर सरांनी मोत्यासारखे अक्षरांमध्ये मयूर चे नाव लिहिलेले होते सगळे जण मयूर ची वाट पाहत होते तेवढ्यात मयूर वर्गाच्या दारात उभा राहिला आणि रागाने जोशाने पाहू लागला त्याच्या दोन्ही हातांमध्ये एक वेगळा जोश होता.

नजरेमध्ये वेगळीच रोख होती. हाताच्या दोन्ही मुठी आवळल्या गेल्या होत्या. त्यांनी सरांना सांगितले की सर कृपया करून असे माझे नाव खोडून टाका.असे झाले की काय असे घडले आहे ज्या हातांनी आज मिळून सत्कार करायचा आहे तेच हात आज मुठी आवळून घट्ट बसलेले आहे काही कळत नव्हते. तेवढ्यात मयूर म्हणाला सर अधिक फळ्यावर माझे नाव पूसा.तुम्हाला कोणी सांगितले मी गरीब आहे ? कदाचित मी सर्वात श्रीमंत आहे. माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ते इतरांकडे सुद्धा नाही .सरांची नजर मयुरीच्या रफू केलेला कॉलर वरून हलत नव्हती. तो सर्वांना विनंती करत होता सर कृपया करून नाहीतर मी आजारी पडेल.

मयूर आता सरांच्या पाया पडू लागला. मयूर ची परिस्थिती आता सरांना कळत होती परंतु सरांना विचारलं की तू गरीब नाही आहे हे मान्य आहे पण श्रीमंत कसं ते तरी सांग अशावेळी मयूर म्हणाला ही सर तुम्हीच मला सांगा मी अभ्यास करत. ज्या वह्या आहेत ते अतिशय पूर्ण आहेत. मान्य आहे मला मी पुस्तक जुनी वापरतो पण त्यामुळे आशय सुद्धा तोच असे आहे की नवीन पुस्तकांमध्ये आहे .माझ्या सगळ्या वह्या आतापर्यंत पूर्ण आहेत त्याचबरोबर शाळेतील सर्व स्पर्धांमध्ये सहभागी घेतो आणि पहिल्या तीनमध्ये माझा क्रमांक येतो. या सर्व गोष्टी माझ्यासाठी अत्यंत श्रीमंत व्यक्ती सारख्याच आहे.जर मी तुमची मदत घेतली तर मला कष्ट करण्याची सवय लागणार नाही.

मी माझ्या वडिलान सोबत रंग काम करण्यासाठी जातो. जेव्हा काम येते तेव्हा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला कामासाठी बोलवतो. शाळेची फीज माझी भरली जाईल तर अशा वेळी मी मेहनत तरी कसा करेन. माझ्या घरातील सगळे मेहनत करतात आई-बाबा जेव्हा रंग काम नसते तेव्हा घर काम करत असतात, स्टेशन वर काम करतात. माझी बहीण पहिली दुसरीच्या मुलांसाठी शिकवणी घेते आणि मी सुद्धा फावल्या वेळात पुस्तक वाचतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र सुद्धा लीहतो.माझ्याकडे पु ल देशपांडे यांचे सही केलेले पत्र आहे. आता तुम्ही सांगा मी नाही का श्रीमंत ? आमच्या घरातले सगळेजण श्रीमंत आहे. सगळेजण मिळून काम करतात. तुम्ही मला हे बक्षीस दिले तर मला मेहनत न करण्याची सवय लागेल. मी आतापर्यंत अनेक चरित्रे वाचली लिंकन ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या सर्वांनी मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त केले आहेत.

जर मलाच आता अशा पद्धतीचे सवय लागली तर मी मेहनत करायचे सोडून देईल आणि या सर्व गोष्टींचा माझ्या भविष्याचा विपरीत परिणाम होऊ लागेल अशावेळी सरांना समोर उभा असलेला मयूर जाधव पहिल्यापेक्षा खूप पटीने वेगळा दिसत होता. सरांना त्याच्याबद्दलचा आदर वाढला होता. आता सरांनी विचार केला की हेच बक्षीस नवीन शीर्षकांतर्गत देण्याचे ठरवले परंतु हे बक्षीस म्हणजे अष्टपैलू विद्यार्थी म्हणून देऊ शकतो का ? असे विचारताच त्यावर मयूर म्हणाला की सर अजून एक-दोन वर्षे थांबा कारण की माझी अजूनही बक्षीस मिळवण्यासाठी पात्रता नाही.

तुम्ही मला अवश्य द्या अशा प्रकारे या सर्व संवादामुळे सरांना अभिमान वाटू लागला की अशा प्रकारचा विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये आहे आणि सर्वांनाच आपला वर्गमित्र मयूर बद्दल एक आत्मविश्वास बघण्याचा दृष्टिकोन बदलला. सांगण्याचे तात्पर्य हेच की आपल्या जीवनामध्ये अनेक असे काही लोक असतात ती स्वाभिमानी असतात आणि आपल्या स्वाभिमानी आणि मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. हेच आपल्याला उंच शिखरावर पोहोचण्यासाठी असते म्हणून आपल्या गरिबीवर कधीच लाजू नका आणि गरीबी जरी असली तरी ती स्वाभिमानी आहे म्हणून जास्तीत जास्त मेहनत करा आणि मेहनतीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर आणि प्रामाणिक तिच्या जोरावर यश प्राप्त करा, असे केल्याने आपल्याला हवे असलेले इच्छित फळ प्राप्त होईल. CR योगेश सराफ (लेखणी वेडा) यांना सलाम.. खूप छान लिखाण.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!