Home / आरोग्य / झोप न येणे Insomnia रात्री झोप नसेल तर हा उपाय करा लगेच गार झोप येईल..!

झोप न येणे Insomnia रात्री झोप नसेल तर हा उपाय करा लगेच गार झोप येईल..!

नमस्कार प्रिय वाचक हो,

आज मी आपल्याला झोप न येणे यासाठी घरच्या घरी असा सोपा उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्याने अनिद्रेचा त्रास अगदी सहज निघून जातो. बऱ्याच वेळेस टेन्शनमुळे देखील आपल्याला झोप लागत नाही. आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात. किंवा वाढत्या वयानुसार देखील हा त्रास आपल्याला होत असतो. कारण कोणतेही असो कोणतेही कारण असले त्यामुळे आपल्याला झोप येत नसेल तरीदेखील हा उपाय केल्याने संस्थेने झोप येण्यास मदत होते.

या उपाया साठी आपल्याला लागणार आहे बडिशोप. हे आपले पचन तर करतेच आणि अनिद्रेचा त्रास देखील काम करते. व यासाठी बडीशेप खूप महत्त्वाचे व फायदेशीर ठरते. यासाठी एका पातेल्यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाका आणि या मध्ये एक चमचा भरुन बडिशेप टाकायची आहे. आणि हे छान उकळून घ्यायचे आहे. यामुळे संपूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरेल.

हा अर्क गाळून घ्यायचा आहे. आपण एक ग्लास पाणी घेतले होते त्याचे बरोबर अर्धा ग्लास पाणी राहिले. इतपत आपण हे उकळून घेतले आहे. आणि बडीशेप अर्क आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. एक या ठिकाणी दूध घ्यायचे आहे. गाई किंवा म्हशीचे दूध यापैकी कोणतेही चालेल.

या दूधामध्ये पाच चमचे बडीशेपचे अर्क टाकायचे आहे. यामध्ये चवीसाठी खडीसाखरेचा देखील वापर करू शकता. नॉर्मल साखरेचा या ठिकाणी वापर करू नये आणि झोपण्यापूर्वी हे दूध पिऊन घ्यायचे आहे. यामुळे अपचनाचा त्रास देखील कमी होतो व अनिद्रेचा त्रास देखील दूर होतो. हा उपाय सात दिवस करायचा आहे हे अर्क तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!