Home / आरोग्य / पॅराशूट तेलाचा घरगुती उपाय, त्वचेचा रंग निरखून जाईल. गोरेपणा येईल अंगावर.

पॅराशूट तेलाचा घरगुती उपाय, त्वचेचा रंग निरखून जाईल. गोरेपणा येईल अंगावर.

नमस्कार नमस्कार प्रिय वाचक हो,

सौंदर्य म्हणजे गोरेपणा असा एक समज आपल्या समाजात आहे. त्वचेच्या रंगावरून सौंदर्याच्या व्याख्या ठरवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याने तुमच्या त्वचेचा रंग लगेच निरखून जाईल.

साहित्य-
१. नारळ तेल/ पॅराशूट तेल
नारळाच्या तेलात अँटी-ऑक्सिडेंट असतात, हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. नारळाचे तेल त्वचेला लावले तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. हे त्वचेतील कोलेजेनचे प्रमाण वाढविण्यात मदत करते. सुरकुत्या आणि बारीक पुरळ देखील कमी होण्यास मदत होते.

२. लिंबू
लिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात जे मुरुम कमी करण्यास मदत करतात.लिंबाच्या फळाची साल वापरुन त्वचा मऊ आणि निरोगी बनते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेचे मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते. लिंबाचा वापर करून चेहर्‍याच्या बारीक ओळी कमी केल्या जातात.

३. हळद
आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे. पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे.

कृती-
१. एका वाटीमध्ये तीन चमचे नारळ तेल घ्या.
२. त्यामध्ये एक चमचा हळद टाका.
३. चांगले मिश्रण तयार झाल्यावर त्यामध्ये दीड चमचा लिंबूचा रस टाका आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या.
४. मिश्रण तयार झाल्यावर हाताने आपल्या त्वचेवर लावावे.
५. १५ मिनिटानंतर त्वचा थंड किंवा साध्या पाण्याने धुवून टाकावी.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!