Home / आरोग्य / पोट साफ होणे फक्त २ मिनिटांत, पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय

पोट साफ होणे फक्त २ मिनिटांत, पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय

नमस्कार प्रिय वाचक हो,

सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण अनेकदा बाहेरचे पदार्थ खात आहोत.बहुतेक वेळा बदललेली जीवनशैली आणि बदललेल्या आहारपद्धती यामुळे आपण कधीही काहीही खात असतो आणि यामुळे आपल्याला पोटाच्या समस्या उद्भवत असतात. बहुतेक वेळा तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खात असताना आपण कोणतेही भान बाळगत नाही आणि यामुळे ऍसिडिटी, पित्त ,अपचन, पोटामध्ये गॅस होणे ,बद्ध” कोष्ठता यासारखे अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात.

अनेकदा आपण खाल्लेले अन्न पदार्थ चावून चावून खात नाही आणि त्यामुळे पचन होते नाही ,अन्न चीपकुन राहते आणि यामुळे शौच सुद्धा स्वच्छ होत नाही. अनेकदा शौच झाल्यानंतर सुद्धा आपले समाधान होत नाही आणि यामुळे आपल्याला अनेकदा पोटाचे वेगवेगळे विकास सुद्धा होतात. आपले पोट नेहमी स्वच्छ असायला हवे. जर आपले पोट स्वच्छ असेल तर आपल्या आतडयांमधील कोटा सुद्धा स्वच्छ राहतो आणि यामुळे आपले शरीर सुदृढ निरोगी राहते. बहुतेक वेळा जर आपले पोट साफ होत नसेल तर आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवत असतात म्हणून अनेकदा डॉक्टर सुद्धा आपल्याला सल्ले देत असतात की आपले पोट नेहमी स्वच्छ असायला हवे व त्यासाठी ते अनेक औषध सुद्धा सांगत असतात परंतु आजच्या लेखामध्ये आपण असा एक घरगुती उपचार जाणून घेणार आहोत,

हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा उपाय आपण करणार आहोत तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. त्यातील पहिला पदार्थ आहे शेंगदाणे.शेंगदाणे आपल्या घरात सहज उपलब्ध होते आणि शेंगदाण्याना गरीबाचा बदाम म्हटले जाते आणि त्याचबरोबर यामध्ये असे काही औषधी गुणधर्म आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त करत असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूठभर शेंगदाणे घ्यायचे आहे आणि हे मूठभर शेंगदाणे आपल्याला एका पाण्याने भरलेल्या पातेल्यामध्ये टाकायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे आणि उकळत असताना आपल्याला एक चमचा सैंधव मीठ टाकायचे आहे आणि हे उकळलेले शेंगदाणे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी चावून-चावून खायचे आहे. असे जर आपण केले तर सकाळी तुमचे पोट व्यवस्थित साफ होऊन जाईल.

पोटामध्ये जी घाण साचलेली आहे ती पूर्णपणे बाहेर निघून जाईल अशा प्रकारे हा उपाय जर आपण पंधरा दिवस सातत्याने केला तर तुमच्या पोटात संदर्भातील जे वेगवेगळे आजार आहे ते सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे आणि तुमची पचन संस्था सुद्धा व्यवस्थित कार्य करणार आहे त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा गावठी तूप ऍड करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी सेवन करायचे आहे ,असे केल्याने सुद्धा तुमचे पोट स्वच्छ साफ होते.

अशा पद्धतीने आपण जर सात दिवस सातत्याने हा उपाय केला तर तुमच्या आतड्यांमध्ये जो मळ साचलेला आहे आतड्यां जवळ जो मळ पकडलेला आहे तो सुद्धा पूर्णपणे बाहेर निघण्यासाठी मदत होणार आहे.हे दोन्ही उपाय अत्यंत साधे सोपी पद्धतीचे असून मात्र तेव्हढेच प्रभावी आहे त्यामुळे हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले राखा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!