Home / अध्यात्म / कि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव

कि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव

नमस्कार प्रिय वाचक हो,

मित्रांनो तसे तर या जगामध्ये आज सुद्धा काही असे चांगले लोक आहेत जे चांगले विचार करतात ज्यांची विचारशैली इतरांना आनंद देत असते काही लोक अशा पद्धतीने कार्य करतात या कार्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळत असते. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशी एक माहिती सांगणार आहोत ती माहिती साधारण असली तरी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. या व्यक्तीने असे काही कार्य केलेले आहे की ज्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये या व्यक्तीबद्दल एक आदराची भावना निर्माण झालेली आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळे स्थान निर्माण झालेले आहे. खरेतर सुरुवातीला अनेक संकटांना सामोरे जावे लागले.अनेक संकटांचा सामना करावा लागला.

जसे की तुम्हाला माहिती आहे आपला समाज कितीही प्रगत झाला तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आजिबात बदललेला नाही. जसे की ट्रान्सजेंडर तृतीयपंथी असे म्हणतात अजून सुद्धा आपला दृष्टिकोन बदललेला नाही आज सुद्धा समाज यांच्याकडे तुच्छ भावनेने पाहत आहेत जरी संपूर्ण समाज तुच्छ भावनेने पाहत नसला तरी समाजातील काही घटक आज सुद्धा या व्यक्तींकडे घाणेरड्या नजरेने आणि चुकीच्या दृष्टिकोनातूनच त्यांच्याकडे पाहत आहे.

खरे तर आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये ज्या व्यक्ती बद्दल माहिती सांगणार आहोत त्या व्यक्तीचे नाव आहे एडम हैरी. एडम हैरी हे देशातील पहिले ट्रांसजेंडर पायलट आहे. जेव्हा त्यांच्या आई-वडिलांना याबद्दलची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या एडम हैरी ला घराबाहेर काढून टाकले. शिवाय आई-वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले तेव्हा त्यांच्याजवळ काहीच पैसे नव्हते. या कारणामुळे अनेकदा रस्त्यावर सुद्द्धा झोपावे लागले होते परंतु त्यांनी हार मानली नाही.

आपल्या अथक परिश्रमाच्या आधारावर आणि मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त केले.एडम हैरी यांचे स्वप्न कमर्शियल पायलट बनण्याचे होते आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रायव्हेट पायलेट लायसन्स चे प्रशिक्षण घेतले. वर्ष 2017 मध्ये त्यांनी जोहान्सबर्गमध्ये त्यांना लायसन सुद्धा मिळाले. त्याने विचार केला होता की आपल्या घरच्यांना या बद्दल सांगावे परंतु या आधीच आई-वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले.

आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की,एडम हैरी यांच्याकडे स्वतःचा खर्च भागवण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. या कारणामुळे त्यांनी ज्युस सेंटर वर सुद्धा काम केले.आपण सगळे जण जाणतात की आपल्या समाजा मध्ये ट्रान्सजेंडर यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहिले जाते. एवढे संकटाच्या पश्चात नंतर एडम हैरी यांनी हार मानली नाही.त्यांनी सोशल जस्टीस विभाग द्वारे आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत मागितली तेव्हा त्यांना एव्हिएशन अकॅडमी जॉईन करण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला.एडम हैरी यांच्या या संकटाच्या काळात केरळ सरकारने त्यांना मदत केली आणि राज्य सामाजिक न्याय विभागातर्फे त्यांना 22. 34 लाख रुपयाची स्कॉलरशिप सुद्धा मिळवून दिली.

या पैशाच्या साहाय्याने त्यांनी कमर्शिअल पायलट कोर्स पूर्णपणे पूर्ण केला. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ,जेव्हा ते एव्हिएशन अकॅडमी चा फॉर्म भरत होते तेव्हा त्यांना आपल्या जेंडर ला धरून अनेक संकटांना सामोरे जावे लागले परंतु त्यांच्या एका शिक्षकाने त्यांची मदत केली. या सगळ्या संबंधांमध्ये आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की वेळेनुसार आपली विचारधारा सुद्धा परिवर्तन करणे गरजेचे आहे.

खरंतर आपल्या सगळ्यांकडून एडम यांना त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. आज सुद्धा आपल्या समाजामध्ये असे अनेक एडम आहेत ज्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे म्हणून आपल्याला आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. जर तुमच्या सुद्धा आजूबाजूला असे काही गरजू तृतीयपंथी असतील तर त्यांना आवश्यक पाठिंबा द्या आणि त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देण्याकरता हातभार लावावा जेणेकरून तुमच्यातील एक माणूस नेहमी जिवंत होईल आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला मदत करून एकमेकांचे जीवन उज्ज्वल करणार आहोत, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवे. तुम्हाला लेख आवडल्यास लाईक ,कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!