Home / आरोग्य / घरगुती उपायाने केसांची लांबी वाढवा, एकदाच लावल्यावर दिसेल फरक.

घरगुती उपायाने केसांची लांबी वाढवा, एकदाच लावल्यावर दिसेल फरक.

सुंदर चेहऱ्यासोबत काळे व लांब केस हे आजच्या जगात सौंदर्याची नवीन ओळख झाली आहे. पण वयाच्या आधीच आज काल केस पांढरे पडत आहेत. प्रदूषण, अयोग्य आहार कींवा अपूर्ण झोपुमुळे या प्रकारच्या समस्या उद्भवतात. आज आम्ही आपल्याला असा एक उपाय सांगणार आहोत, जो केल्याने आपल्या केसांना आवश्यक ती पोषक तत्वे मिळतीलच आणि केस देखील चांगले होतील.

साहित्य-
१. कडुनिंबाची कोवळी पाने
२. जास्वंदीची पाने

३. नागिनीची पाने ४. कडीपत्ताची पाने
५. नारळ तेल/बदाम तेल

कृती-
१. सर्व पाने स्वच्छ पाण्याने धुवून काढावी आणि कोरडी करून घ्यावी. २. जास्वंदीची पाने कात्रीच्या किंवा चाकूच्या साहाय्याने बारीक करून घ्यावीत.
३. एका कढईत किंवा मोठ्या वाटीत चार ते पाच चमचे नारळ तेल घ्या.

४. त्यामध्ये सर्व प्रकारची पाने सम प्रमाणात टाकावीत. ५. त्यानंतर कढईतील पाने ब्राउन होईपर्यंत कढई गॅस वर मंद आचेवर ठेवावी. (असे केल्यास झाडाच्या पानांमधील पोषक तत्त्वे तेलात येतील). ६. १० मिनिटानंतर तेल थोडं थंड होऊन द्यावे. थंड झालेले तेल गाळून घ्यावे.

७. तेल पूर्ण थंड झाल्यावर बाटलीमध्ये भरून ठेवा. तयार झालेल्या या तेलाने आठवड्यातून दोन दिवस मालिश करावी. एक महिनाभर तुम्ही हे तेल वापरू शकता.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!