Home / आरोग्य / फक्त तीन दिवस अंघोळीच्या पाण्यात घाला हा घटक, आणि कसल्याही फंगल इन्फेक्शन करा लवकर सुटका…

फक्त तीन दिवस अंघोळीच्या पाण्यात घाला हा घटक, आणि कसल्याही फंगल इन्फेक्शन करा लवकर सुटका…

सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. आणि पावसाळ्यात असणारे दमट वातावरण बुरशीच्या वाढीसाठी लाभदायी असते. अशामुळेच या दिवसात बऱ्याच लोकांना नायटा किंवा फंगल इन्फेक्शन होतात. त्यामुळे खूप खाज सुटते व त्रास देखील खूप होतो. विशेषतः जांघेत, काखेत, मानेला, हात आणि पायावर फंगल इन्फेक्शन तयार होते आणि एकदा तयार झाले की तीन-चार वर्षे फंगल इन्फेक्शन ठीक होत नाही. बरेच लोक खूप महागडे उपचार करतात, गोळ्या औषधे घेतात पण त्याचा काहीच परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आम्ही आपल्याला आज अगदी साधा सोपा व घरगुती उपाय सांगणार आहोत.

कृती – (पहिल्या रात्री)
रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे बदाम तेल एका वाटीमध्ये घ्यावे. त्यामध्ये अर्धा ते एक चमचा बेकिंग सोडा टाकावे. यांचे चांगले मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. आणि झोपताना ज्या भागी फंगल इन्फेक्शन झाले आहेत, त्याठिकाणी लावायचे आहे.

बदाम तेलामुळे त्वचा मऊ पडते तर बेकिंग सोडमुळे आपल्या शरीरावरील फंगल इन्फेक्शन नाहीसे होते. याचबरोबर यामुळे फंगल इन्फेक्शनचे काळे डाग सुद्धा नाहीसे होतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकावी किंवा ज्या भागामध्ये आपण फंगल इन्फेक्शनवर बेकिंग सोडा व बदाम तेल लावलं आहे , ती जागा तुरटीच्या पाण्याने धुवून काढावी.

कृती- (दुसऱ्या रात्री)
रात्री झोपताना, ज्या भागामध्ये आपल्याला फंगल इन्फेक्शन झाले आहे, त्या भागामध्ये आपल्याला एरंडेल तेल लावायचे आहे. एरंडेल तेल लावल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी सकाळी तो तुरटीच्या पाण्याने धुवायचा आहे किंवा तुरटीच्या पाण्याने अंघोळ करायची आहे.

ही कृती तुम्हाला सलग सहा दिवस करायची आहे. सहा दिवस दररोज तुम्हाला तुरटीच्या पाण्याने अंघोळ करायची आहे. हा उपाय केल्याने कुठल्याही प्रकारच फंगल इन्फेक्शन अगदी सहजपणे घालवता येते.

पाळावी लागणारी पथ्ये-
ज्यादिवशी उपाय चालू केला आहे, त्यादिवसापासून पुढील १५ दिवस तुम्हाला केळी, पपई, अंडे, मासे आणि खेकडा खाता येणार नाही. ही पथ्ये तुम्हाला सलग १५ दिवस पाळायची आहेत.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!