Home / आरोग्य / पाण्यामध्ये मिसळा फक्त ही एक वस्तू, तुमचे केस एवढे वाढतील की सांभाळणे शक्य होणार नाही!

पाण्यामध्ये मिसळा फक्त ही एक वस्तू, तुमचे केस एवढे वाढतील की सांभाळणे शक्य होणार नाही!

आपल्यापैकी अनेक जण केसांच्या समस्या बद्दल नेहमी चिंता व्यक्त करत असतात. केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात त्यासाठी अनेकदा आपण रासायनिक पदार्थ वापरत असतो परंतु या रासायनिक पदार्थांचा वापर केल्यामुळे अनेकदा केस चांगले बनण्याऐवजी केस दिवसेंदिवस अधिक तूटत जातात,केसांमध्ये कोंडा वाढत जातो आणि यामुळेच अनेकदा टक्कल पण येऊ लागते म्हणूनच..

आपल्या केसांचे आरोग्य चांगले राखण्या करिता आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहणार आहे पण त्याचबरोबर केसांना मजबूती सुद्धा प्राप्त होणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल…

आपल्यापैकी अनेक जण केस गळती च्या समस्येला वैतागलेले असतात. केस गळती थांबण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात तरीही केस गळती थांबत नाही म्हणून आज आपण उपाय करणार आहोत. हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि या उपाया साठी वापरण्यात येणारे पदार्थ सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपण चहा पावडर वापरणार आहोत. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये केसांचे आरोग्य चांगले राखणे वेगळ्या पद्धतीने केला जाणारा उपाय सांगण्यात आलेला आहे चहाच्या पावडर मध्ये टॅनिन नामक घटक असते जे आपल्या केसांचे इन्फेक्शन दूर करून आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी काही तांदूळाचे दाणे घ्यायचे आहेत. तांदूळाचे दाणे व त्याचे पाणी आपल्या केसांचे आरोग्य मजबूत करते व केस गळण्या पासून सुद्धा रोखत असते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे दोन्ही पदार्थ आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकून एक ग्लासभर पाणी त्यात ॲड करायचे आहे. तुम्ही दोन दिवस हे मिश्रण भिजवून ठेवू शकता पण तुम्हाला वेळ नसेल तुमच्या कडे जास्त वेळ नसेल. तुम्हाला हा उपाय लवकर करायचा असेल तर अशा वेळी तुम्ही हे पातेल्यातील पाणी गॅसवर मंद आचेवर ठेवू शकता. काही काळानंतर आपल्याला हे पाणी चांगल्या पद्धतीने उकळायचे आहे जेणेकरून या पाण्यामध्ये चहापत्ती व तांदूळ यांचे अर्क उतरू शकेल त्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये कडीपत्ता चे सात ते आठ पाने आपल्याला टाकायचे आहे .

कढीपत्ता मध्ये असे काही औषधी गुणधर्म व एंटीऑक्सीडेंट पदार्थ उपलब्ध असतात जे आपल्या केसांच्या नलिका सुधारण्यास मदत करत असतात आणि आपल्या केसांच्या मुळाशी पोषक तत्त्वांची निर्मिती करत असतात यामुळे आपले केस मजबूत बनतात आणि मिश्रणाच्या उपयोगाने केस चमकु शकतात ,असे केल्याने तुमचे केस गळण्याचे कमी होतात आणि केसांना पोषक तत्व मिळाल्यामुळे आपले केस नेहमी चांगले चमकदार आणि मजबूत बनतात.

या मिश्रणाचे नियमित वापराने आपले अकाली होणारे पांढरे केस सुद्धा काळे बनतात परंतु केस पांढरे झाले असेल तर नैसर्गिक उपायांचा जास्तीत जास्त वापर करा परंतु रासायनिक द्रव्यांचा जास्त वापर करू नका यामुळे तुमचे केस खराब होतील त्याचबरोबर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहणार नाही म्हणून केसांच्या संदर्भात उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त घरगुती आणि आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेले उपचार करा जेणेकरून तुमचे केस चांगले होतील. हा उपाय तुम्ही महिनाभर सातत्याने केला तर तुमचे केस गळणे बंद होणारच आहे पण त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा झाला असेल अकाली पांढरे पण आली असे वारंवार तूटत असतील तर या सगळ्या समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होणार आहेत.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!