Home / आरोग्य / दिवसातून फ़क्त एकदा चेहऱ्यावर लावून बघा हा नुस्खा आणि चेहऱ्यावरील सर्व डागांपासून मिळवा सुटका.

दिवसातून फ़क्त एकदा चेहऱ्यावर लावून बघा हा नुस्खा आणि चेहऱ्यावरील सर्व डागांपासून मिळवा सुटका.

आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी चेहरा सुंदर बनवण्याचा आणि चेहऱ्यावरील डाग दूर करण्याचा एक सोपा मार्ग घेऊन आलो आहोत. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे. जर तुमच्याकडे तुमच्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वेळ नसेल, जर तुमच्याकडे ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी पैसे नसेल, तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय तुमच्या चेहऱ्यावर नक्की करून पहा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक अद्भुत चमक नक्कीच दिसेल आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा सहजपणे परत मिळवू शकाल.

● ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारी सामग्री :-

१) बेसन :- बेसन हे आपल्या सर्वांच्या घरी सहज पणे उपलब्ध असतोच आणि जर नसेल तर तुम्ही बेसन दुकानातून सुद्धा आणू शकता. बेसनचा वापर त्वचेला मऊ आणि गोरा करण्यासाठी खुप आधीपासून केला जात आहे. बेसन आपच्या चेहऱ्यावरील एक्सेस ऑइल काढून टाकते आणि त्वचेला तेलकट होण्यापासून वाचवते. बेसनचे लहान कण मृत पेशी काढून टाकतात आणि उत्तम क्लीनर म्हणून काम करतात. बेसन आपल्या चेहऱ्यावर मुरुम येऊ देत नाही. त्वचेवर बेसनचा वापर नियमितपणे केल्याने आपल्या त्वचेवर वयाच्या आधी साग येऊ देत नाही आणि त्वचेसाठी स्क्रब म्हणून काम करतो. यासह, बेसनाच्या वापराने चेहरा आतून स्वच्छ करतो. बेसन कोरड्या किंवा तेलकट सर्व प्रकारच्या त्वचेला अनुकूल आहे.

२) नींबू :- यासोबतच आपल्याला घ्यायच आहे अर्ध्या लिंबाचा रस. आपल्याला लिंबाच्या रसाचे फ़क्त काही थेंब घ्यायचे आहेत. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते तसेच नींबू हे एक प्रकारे नैसर्गिक ब्लीच म्हणून देखील काम करतो. नींबूच्या रसाने पिगमेंटेशन निघुन जातात.

३) बीट चे ज्यूस :- यासोबत आपल्याला बीटरूट म्हणजेच बिट घ्यावे लागेल. बिटचा रस आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. तो पोषक तत्वांचा साठा आहे. आपल्याला फक्त अर्धा बिट घ्यायच आहे, ते चांगले धुवावे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करावे. त्यानंतर या बारीक केलेल्या बिटचे कापडाने किंवा चाळणीने रस काढून घ्यावे. आपल्याला बिटच्या रसाचे फक्त 2 किंवा 3 चमचे हवे आहे. बिटचा रस जितका आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकाच तो आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

४) कोरफड :- आपल्याला अजुन एक गोष्ट घ्यावी लागेल ती म्हणजे कोरफड जेल. कोरफड ही वनस्पती आपल्या घरात असणे आवश्यक आहे किंवा घरात नसेल तर तुम्हाला कोणत्याही रोपवाटिकेत ही वनस्पती सहज पणे मिळेल. कोरफड जेल त्वचेला खुप फायदेशीर आहे.आपल्याला ताजे कोरफड जेल घ्यायचे आहे. आपल्याला फक्त १ चमचा हा जेल लागेल.

५ )या सोबतच आल्याला दुधाची पावडर घ्यायची आहे. जर तुम्हाला चमकदार चेहरा मिळवायचा असेल तर या मिश्रणात दुधाची पूड नक्की घाला. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही एक चमचा कच्चे दूधही घेऊ शकता.

● उपाय बनवण्याची कृती :-
आता या पाचही घटकांना एका बाऊल मध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. आता हे तैयार झालेले मिश्रण आपल्या चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावावे. यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच आहे.

हे मिश्रण आपण रोज आपल्या चेहऱ्यावर लावू शकतो. आपल्याकडे वेळ कमी असल्यास, आपण आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे मिश्रण वापरू शकता. हे मिश्रण लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डाग नक्कीच निघून जातील आणि तुमच्या चेहऱ्यावर बरीच चमक येईल व तुमची त्वचा चमकू लागेल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!