Home / आरोग्य / तुम्हालाही जर तुमचे केस अगदी चित्रपट सृष्टी मधल्या कलाकारांसारखे सिल्की आणि चमकदार बनवायचे असेल तर नक्की हा देसी उपाय करून बघा

तुम्हालाही जर तुमचे केस अगदी चित्रपट सृष्टी मधल्या कलाकारांसारखे सिल्की आणि चमकदार बनवायचे असेल तर नक्की हा देसी उपाय करून बघा

आजच्या काळामधे आपण पाहतो की कित्येक तरुण व तरुणी आपल्या केसांना घेऊन खुप काळजी मध्ये असतात आणि आपले केस हे सुव्यवस्थित दिसावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे हेअर ऑइल, हेयर डाय किंवा इतर महागड्या मेडिसिन घेत असतात.

पण हे सर्व उपाय करून देखील अनेक जणांना केसांच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे,एक असा नुस्खा जे वापरून आपण केसांची थांबलेली वाढ, केस गळती आणि पांढरे केस अश्या अनेक समस्यांना समाप्त करू शकालतर जाणून घेऊया त्याकरीता लागणारी सामग्री.

देसी उपाय लागणारी साठी सामग्री :-

●तांदूळ
सर्वात अगोदर एक वाटी तांदूळ घ्या आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे, त्यानंतर हे तांदूळ भिजवुन ठेवा.तांदूळ धुतलेला पाणी आपल्या केसांसाठी फार उपयोगी असतो. आपण काही दिवस तांदूळ भिजवलेला पाणी केसांवरती प्रयोग करुन बघा यानंतर नक्कीच तुमचे केस अगदी सॉफ्ट व सिल्की होतील इतकेच नव्हे तर तुमचे केस गळणे देखील बंद होईल आणि केस खुप चमकदार होतील.

●कलौंजी/मंगरेला
दूसरी वास्तु आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे कलौंजी. ज्याला मंगरेला असे ही म्हटले जाते. कलौंजी ला इंग्रजीत नायजेला सीड्स असे देखील म्हणतात. कलौंजी ही फार उत्तम औषधी असून विविध प्रकारच्या आजारांमधे औषध बनवण्याकरीता कलौंजी चा प्रयोग केला जातो.कलौंजी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, विटामिन बी1 , बी2 आणि बी3 तत्त्व असतात. त्यासोबतच त्यात फोस्फरस व आयरन देखील असतो जो आपल्या केसांना मजबूत करतो.

●मेथी
सोबतच आपण घेऊया मेथी. मेथी ही केसांची गळती थांबवण्यासाठी खुप उपयोगी आहे.सोबतच मेथी मध्ये असलेला निकोटेनिक एसिड हा केस पांढरे होण्यापासून थांबवतो. त्यामध्ये असलेले विटामिन सी आणि पोटैशियम नविन केस उगवण्यास मदत करतो।

देसी उपाय बनवण्यासाठी कृती:-
तर एक वाटी तांदूळ, दोन चमचे कलौंजी आणि चार चमचे मेथी ही पाण्यामध्ये भिजवुन ठेवावी.आणि रात्र भर किंवा 24 तास त्याला तसेच राहू देणे. हे सर्व आपल्याला काचेच्या भांड्यामध्येच भिजवुन ठेवायच आहे. यानंतर आपण पाहू शकाल की तांदूळ, मेथी आणि कलौंजी पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळल्या गेले आहे आणि पाण्याचा रंग देखील बदललेला आहे. या नंतर आपल्याला चाळणीने मिश्रणाला गाळून घ्यायचे आहे आणि ते पाणी एका बाटलित भरून ठेवायचे आहे।

मिश्रणाचा हा पाणी रोज रात्री केसांवरती लावायच आहे आणि सकाळी केस धुवून घ्यायचे आहे. हा प्रयोग करतांना आपण पाहू शकाल की काही दिवसांतच आपल्याला खुप मोठा फरक जाणवेल आणि केस मजबूत, काळेशार, सिल्की आणि चमकदार होतील..

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!