Home / आरोग्य / ड्रॅगन फ्रुट खाणाऱ्याला हे 9 आजार कधीच होऊ शकणार नाही; डायबिटीज, डेंग्यू, पांढरे पेशी कमी..!

ड्रॅगन फ्रुट खाणाऱ्याला हे 9 आजार कधीच होऊ शकणार नाही; डायबिटीज, डेंग्यू, पांढरे पेशी कमी..!

तुम्ही लाल रंगाचे किंवा आतून पांढरे व बाहेरून लाल असणारे ड्रॅगन फ्रुट तुम्ही नक्की पाहिले असेल. असे हे ड्रॅगन फ्रुट आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे. आणि यामुळेच या फळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ड्रॅगन फ्रुट चे झाड निवडुंग प्रजातीची वनस्पती असते हमखास नफा देणारे पीक म्हणून आज काल शेतकरी याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

हे ड्रॅगन फ्रुट नियमित खाल्ले तर कोणताच आजार आपल्याला सहजासहजी होत नाही. कारण यामध्ये असणारे विटामिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवते. जेणेकरून कोणत्याच आजारांचे संक्रमण आपल्याला सहजासहजी होत नाही. ड्रॅगन फ्रुट आपले सौंदर्य वाढवण्यासाठी देखील उपयुक्त असते. यामध्ये असणारे अँन्टिऑक्सिडंट आणि इतर पोषक द्रव्यांमुळे केसांच्या आणि त्वचेच्या समस्या नष्ट होतात.

ड्रॅगन फ्रुट चा फेस मास्क बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स सुरकुतलेली त्वचा किंवा काळे डाग गोरे होतात. केसांच्या मुळापाशी याचा गर लावल्याने केस गळती थांबून केस मजबूत आणि मुलायम बनतात. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोटाचा त्रास कमी होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. यामध्ये बीटा कॅरोटीन रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयविकाराचा धोका देखील कमी करतात. यामधील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवून रक्ताचे प्रमाण देखील वाढवते. म्हणून एनीमिया चे लक्षण असणाऱ्या व्यक्तीने ड्रॅगन फ्रुटचे सेवन अवश्य करावे. डेंगू झाल्यानंतर शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात तसेच हाडेसुद्धा कमजोर बनतात. अशावेळी ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो.

ड्रॅगन फ्रुट खाल्ल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून पांढऱ्या पेशींच्या निर्मितीला उत्तेजना मिळते. आणि या सोबतच हाडे देखील मजबूत होतात. यामधील लायकोपेन नावाचे तत्व कॅन्सर विरोधात कार्य करते. गर्भवती महिलांनी या फळाचे सेवन केल्याने त्यांना रक्ताची कमतरता कधीच जाणवत नाही. ड्रॅगन फ्रुट आपल्या आहारात समावेश केल्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. असे हे बहु उपयोगी फळ तुम्ही देखील नेहमी खा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!