Home / आरोग्य / मान काळी झालीये? बघा काय करायचे आहे त्यासाठी उपाय.

मान काळी झालीये? बघा काय करायचे आहे त्यासाठी उपाय.

नमस्कार..

बऱ्याचदा बाहेरील वातावरणात फिरल्याने चेहऱ्यावर धूळ बसते, मळ आणि घाण तयार होते. ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग काळपट होत जातो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवरील मळ व घाण काही मिनिटात कशी घालवली जाऊ शकते.

प्रक्रिया-
एक स्वच्छ वाटी घ्या. त्यामध्ये पाच चमचे गुलाबजल टाका. त्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन टाका. त्यामध्ये एक चमचा ऍलोवेरा जेल टाका. या तिन्ही गोष्टींचे व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्या. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर आपले औषध तयार झाले आहे. आपण हे मिश्रण कुठल्याही साध्या बाटलीमध्ये सात दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

शरीरावर कसे लावाल?

रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण आपण चेहऱ्यावर स्प्रे करू शकतो. स्प्रे बॉटल नसल्यास आपण कापसाच्या बोळ्याने देखील हे मिश्रण चेहऱ्यावर किंवा त्वचेवर कुठेही लावू शकतो. सकाळी उठल्यावर साध्या पाण्याने धुवून टाका. आपल्याला त्वचेमध्ये फरक जाणवेल. हीच क्रिया आठवड्यातुन २-३ वेळा करा. एकदम नैसर्गिक असल्याने यामुळे इतर कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत.

१. गुलाबजलमुळे चेहऱ्यावरील फोड आणि पुरळ घालवते.
२. ग्लिसरीन मुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जातात व मऊपणा येतो.
३. ऍलोवेरा (कोरफड) मुळे चेहऱ्यावरील जीवजंतू निघून जातात तसेच फोड्या आणि पुरळ देखील नाहीसे होतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!