Home / Motivation / मध्यरात्री मित्राचा फोन, लवकर माझ्याजवळ ये.! दुसऱ्या गावी गेल्यावर हे मित्राला कळले तेव्हा तो हादरून गेला.

मध्यरात्री मित्राचा फोन, लवकर माझ्याजवळ ये.! दुसऱ्या गावी गेल्यावर हे मित्राला कळले तेव्हा तो हादरून गेला.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट मी रात्री जेवून निवांत बसलो होतो. दहा वाजले असतील माझ्या एका जवळच्या मित्राचा फोन आला. हॅलो, काय करतो आहेस? काही नाही बसलो आहे. काय विशेष? मी म्हणालो. आत्ता लगेच येऊ शकशील का घरी? हो येतो. आणि मी फोन बंद केला. मी कपडे बदलले आणि गाडी बाहेर काढायला निघालो मित्र दुसऱ्या गावी राहत होता. जायला दीड दोन तास लागत होते लगेच बोलावले आहे म्हणजे काहीतरी कारण असावे.

काही पैसे कॅश लागणार आहे का? बरोबर कोणाला घेऊन येऊ का? हे विचारण्यासाठी मी मित्राला परत फोन लावला. अरे मी स्टार्टर मारतोय काही घेऊन यायला पाहिजे आहे काय? यावर तो काहीच बोलला नाही पण रडू लागला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली काय घडले आहे ते कळेना. मी विचारले काय झाले काही बोलेना नुसताच रडू लागला. मी काय बोलू ते कळेना एवढ्यात फोन वर दुसरं कोणीतरी बोललं. मला अपरिचित आवाज होता बहुदा मित्राचा मित्र असावा. काही झाले नाही काळजीचे कारण नाही तुमचे मित्र आनंदाने रडत आहेत.

मी अधिकच गोंधळून गेलो, थांबा मी तुम्हाला सगळे सांगतो. मित्राचा मित्र बोलत होता आम्ही सात आठ जण बसले आहेत. मैत्री वर चर्चा चालू होती बोलता-बोलता एक पैज लागली. आत्ता प्रत्येकाने त्याच्या बाहेरगावच्या मित्राला फोन करायचा आणि लगेच ये म्हणून सांगायचे तो मित्र येतो म्हणाला पाहीजे आणि पैजेतील महत्त्वाची अट म्हणजे त्या मित्राने काय कशाला एवढ्या रात्री का? सकाळी आलो तर चालेल का? असे त्याने विचारता कामा नये.

आम्ही सगळ्यांनी मित्राला फोन केले पण प्रत्येकाने काय कशाला म्हणून विचारले. फक्त तुम्हीच काही शंका न घेता येतो म्हणालात आणि काय आणू का विचारले आम्ही का स्पीकर फोनवर ठेवला होता. तुमच्या मित्राला गहिवर येऊन तो रडत आहे तो पैज जिंकला आहे आणि तो या परीक्षेत पहिला नंबर वर आहे.

तुमच्या मैत्रिणीला सलाम. आता मीही रडू लागलो, पहिला नंबर ने पास झाल्याच्या आनंदात. भरपूर मोठी फ्रेंडलिस्ट ठेवण्यापेक्षा मोजकेच फ्रेंड्स ठेवा कि जे तुमच्या गरजेच्या वेळी कसलाही विचार न करता धावून येतील. आणि लोकांचे एफबीवर 5000 फ्रेंड असतात आणि रियल मध्ये कोणी ओळखत नाही त्यामुळे थोडावेळ हा आपला फॅमिली फ्रेंड यांच्यासाठी द्या. गरजेच्या वेळी तेच धावून येतात. आपल्या जवळच्या मित्राला शेअर करा. कमेंट मध्ये त्याला mention करा.

तात्पर्य —- भरपूर मोठी फ्रेंड लिस्ट ठेवण्या ऐवजी मोजके च असे फ्रेंड ठेवा की जे तुमच्या गरजेच्या वेळी कसला ही विचार न करता धाऊन येतील. नाही तर लोकांचे fb वर 5000 फ्रेंड असतात अन रिअल मध्ये कोणी ही ओळखत नाही त्यामुळे थोडा वेळ हा आपली फॅमिली आपले फ्रेंड याच्या साठी द्या गरजेच्या वेळी तेच धाऊन येतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!