Home / आरोग्य / त्वचेवरील शीतपित्ताच्या गांधी कायमच्या घालवण्यासाठी सर्वात जवळचा उपाय, वात-पित्त-कफ बॅलन्स करा..!

त्वचेवरील शीतपित्ताच्या गांधी कायमच्या घालवण्यासाठी सर्वात जवळचा उपाय, वात-पित्त-कफ बॅलन्स करा..!

अंगावर वारंवार पित्त उठत असेल तर करा हा घरगुती उपाय. तुमच्या घरात थंड पडणारी शहाबादी फरशी असेल तुम्ही पित्तप्रकृतीचे असाल किंवा वातावरणातील गारवा वाढला असेल तुम्ही अंगावर उबदार कपडे वापरले नाही तर अंगावर गांधील माशी चावल्यास सारखे जशा मोठ्या मोठ्या गांधी येतात तशाच गांध्या येऊन त्या प्रचंड आग आणि खाज निर्माण करतात.

पावसाळ्यात असे ओले कपडे वापरल्यामुळे खास निर्माण होते तसेच महिलांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवत राहतो. याला वैद्यकीय भाषेत Urticaria/Hives म्हणून देखील ओळखले जाते. अशा भयंकर आणि दाहक करणाऱ्या शीतपित्ता पासून कायमची सुटका करण्यासाठी आज आपण एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत‌.

यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे खोबरेल तेल. तुम्ही तुमच्याकडील उपलब्ध अगदी लाकडी घाण्याचे खोबरेल तेल सुद्धा वापरू शकता. साधारणता एक चमचा तेल एका वाटी मध्ये घ्यायचे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे भीमसेन कापूर.

आपण दोन ते तीन ग्रॅम एवढा कापूर चा तुकडा बारीक करून घ्यायचा आहे. भीमसेन कापूर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो. यामध्ये anti-inflammatory आणि ऑंटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला येणारी खाज आणि त्वचेचे सूज कमी करतातच पण भीमसेन कापरामुळे त्वचेचा दाह कमी होतो. आता ही तयार झालेली पावडर या तेलामध्ये टाकून व्यवस्थित पणे मिक्स करायची आहे.

आजच्या या उपायासोबतच आहारात आंबट, तेलकट, तुपकट पदार्थ काही दिवस वर्ज करावे. कारल्याची भाजी, भोपळ्याची भाजी किंवा दुर्वांचा रस तीन ते चार दिवसांमध्ये घेतल्याने पित्ताचा त्रास उद्भवत नाही. आमसुलाची चटणी घेतल्यामुळे शरीरातील वात कफ व पित्तदोष बॅलन्स होतो. आता तयार झालेली ही गांधी आलेल्या त्वचेवर वापरायची आहे. यामुळे त्वचेचा दाह झटपट कमी होतो. व त्वचेला गारवा मिळतो. सलग सात ते आठ दिवस हा उपाय नियमित केल्याने आणि आहारातील पथ्ये पाळल्याने शीत पित्ताची समस्या ही कमी होते.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!