Home / अध्यात्म / म्हातारा झाला म्हणून शेठ ने या कामगाराला हाकलून दिले पुढे जे घडले ते पाहून…!

म्हातारा झाला म्हणून शेठ ने या कामगाराला हाकलून दिले पुढे जे घडले ते पाहून…!

ए शिव्या हे दोन गट्ठे ठेव साहेबांच्या गाडीत. शेटजींनी मारलेली हाक ऐकून दुकानाबाहेर बसून असलेला आपल्या वयाची साठी गाठलेला शिवा. व्हय जी, आलो म्हणत जागेवरचा उठला. दुकानातील 25 किलो तांदळाचा कोलम उचलू लागताच अंधारी आल्यासारखे वाटून त्याचा एकदम तोल गेला. अन तांदळाचा गठ्ठा खाली पडला. तोही पडता पडता वाचला. इतक्या वर्ष हमाली करता करता आयुष्य चालले आपलं पण कधी तोल गेला नाही. पण आज, आज असं कसं झालं? शिवाने स्वतःलाच पोसलं. काय रे एवढी काम होत नाहीत का तुझ्याने ? किती वर्षापासून काम करतोयस शेठजी ओरडले.

शेठजींनी ओरडतानाच बघून बाजूला उभे असलेले एक सत्तरीचे एक गृहस्थ पुढे आले. आणि शिवाला म्हणाले थांबा दादा मी मदत करतो तुम्हाला गठ्ठा उचलायला. त्यांनी शिवाला गठ्ठा उचलायला हातभार लावला. म्हणाले, या दादा इकडे माझ्या गाडीच्या डिक्कीत गठ्ठा ठेवू. हे बघताच शेठजी जागेवरून उठले व म्हणाले अरे साहेब तुम्ही कशाला त्रास घेता, त्याचे कामच आहे ते. आता थोडं वय झाला आहे त्याचं त्याला झेपत नाही काम. हो ना.! कधीकधी शरीर निरोगी असतं मात्र मन थकले तरी कामाचं ओझं अवघड वाटतं शिवा कडे बघत ते बोलले. बाकी काय म्हणता साहेब?

शेटजी ने त्याची ख्यालीखुशाली विचारली. महाराजांच्या कृपेने सर्व उत्तम चालले आहे. त्यांचा उत्सव जवळ आला आहे ना त्याचीच तयारी सुरू आहे. बर येतो शेटजी गडबडीत आहे जरा. या तुम्ही परवा महाराजांच्या दर्शनाला.! आणि महाप्रसादाचा ही लाभ घ्या. शिवाय, शिवा कडे बघून तेही म्हणाले दादा तुम्ही या शेवटी ते सदगृहस्थ गाडीत बसून निघून गेले. शिवा त्यांच्याकडे बघत राहिला किती भारदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांचे.! माझ्यापेक्षा वयाने मोठे असूनही किती आदराने माझ्यासोबत ते वागले. अशा व्यक्ती फार कमी अनुभवास येतात. त्याला त्या व्यक्तीबद्दल खूप आदर वाटला.

तो पुन्हा जागेवर जाऊन बसला आजच्या घटनेने पुन्हा त्याच्या मनात चिंता निर्माण झाली. काम तर करावेच लागणार आपल्याला पण आता ओझे उचलले जात नाही दिवसेंदिवस शरीर तर थकत चाललयं पण मनावर ही मरगळ यायला लागली आहे. पण ऐत बसून खानं काही आपल्या नशिबात नाही. गठ्ठे उचलन्या ऐवजी शेटजींनी एखाद हलकाफुलका काम आपल्याकडे बघून दिलं तर.! आपल्या आयुष्याचे सरते दिवस आले तरी काबाडकष्ट काही संपले नाही. लहानपणापासून पोती उचलत आहे आणि आता इथेच काम करत आहे. त्याला त्या सद् गृहस्थांचे बोलणे आठवले त्यांच्यासारखीच आपल्यावर ही कोणाची तरी कृपा व्हायला हवी होती आयतं बसून खायला आलं असतं. आणि त्याच्या मनात महाराजांच्या दर्शनाची आस निर्माण झाली.

त्यांनी शेटजीना विचारले, कुठे आहे जी महाराजांचा मंदिर? शेठजींनी त्याला पत्ता दिला. जाशील परवा तिथे महाप्रसादाला? शिवाने हो म्हणून मान डोलावली. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला पण थकल्यासारखे वाटत होते. त्याचाने ते काम झाले नाही शेठ म्हणाले, शिवा तू उद्यापासून कामावर नको येत जाऊ. तुझ्याच्याने काम झेपत नाही मी तुझ्या जागी दुसरा तरून ठेवला आहे. उद्या त्या मंदिरात जा तिकडे काम न करता ही ठेवेल तुझ्या हातात चार पैसे. अचानक पणे शेटजी बोलले आणि शिवा वर जणू डोंगरच कोसळला. असे एकदम कामावरून काढू नका शेठजी एवढ्या वर्षापासून मी इथे काम करत आहे. छोटे कुठलेही काम करेल मी दोन पैसे कमी दिले तरी चालतील पण मला कामावर ठेवा. नाहीतर मी बायको चे पोट कसे भरू आता या वयात कुठे काम शोधू. शेटजी ना वारंवार विनंती करून हात जोडून तो म्हणू लागला. शेटजींनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. गण्या हे पोते उचलं म्हणून शेटजी ने एका तरुण व्यक्तीला आवाज दिला.

संध्याकाळपर्यंत दुकानाजवळ बसून शिवा घरी निघाला चालताना त्याचे डोळे भरून येऊ लागले आता बायकोला काय सांगणार.? तीही दोन वर्षापूर्वी धुणं-भांडी करायला घराबाहेर जायची. परंतु कोणीतरी गाडीने तिला ठोस मारली व तिला अपंगत्व आले. घरातले कोणतेही काम ते घुसतघुसत करायची पोरांचे लग्न लावून दिल्यामुळे त्यांचा वेगळा संसार थाटून दिल्यामुळे आता ते दोघंच घरात होते काय करायचे बरे.? त्याला सुचत नव्हते पोटापुरते कमावण्याच्या नादात आजचं तर झालं पण उद्याची चिंता करण्यात कधी मंदिराकडे पाय वळलेच नाहीत आणि आपलं ओझ दुसऱ्यावर लादणं कधी जमलंच नाही आपल्याला.

पण आता उद्या महाराजांच्या मंदिरात महाप्रसाद आहे तिथे जायला हवं येताना बायकोसाठी पण प्रसाद घेऊन येऊ. चला उद्याच्या तर जेवणाची चिंता मिटली. महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर हात जोडून गार्हाने मांडू आपले. काहीतरी मार्ग निघेल या विचाराने त्याच्या मनावरचं ओझं थोडं कमी झालं. तो घरी पोहोचला आणि शांत मनाने जेवण करून झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करुन तो महाराजांच्या मंदिरात पोचला. त्याने दुरून पाहिले मंदिरात सभामंडपात सगळीकडे भक्तांची गर्दीच गर्दी दिसत होती. गर्दी कमी झाली
की आता आपण जाऊन दर्शन घेऊ म्हणून तो जवळचा झाडाखाली बसला. मंदिराबाहेर भीक मागणार्यांची गर्दी जमली होती. आपल्या अवतारावरून आपल्याला कोणीही याचकचं समजेल. असे काम न करता पैसे घेणे हे त्याच्या मनाला पटत नव्हते. त्याचे लक्ष सभामंडपात ठेवलेल्या भक्तांच्या पादत्राणांच्या ढिगार्याकडे गेले. इतक्या मोठ्या डी कार्यात आपल्या पादत्राणांच्या जोड शोधणे भक्तांना कठीण जात होतं.

कोणीतरी त्याच्या पायात नाणं टाकलं शिवाने त्या व्यक्तीकडे बघितलं दादा म्हणून आवाज देऊन थांबवले. आणि खाली वाकून त्याने आपल्या उपरण्याने त्या व्यक्तीचे बूट साफ करू लागला. अरे.! हे काय करतोयस म्हणून त्या व्यक्तीने त्याला हात धरून उठवले. अरे वेड्या सेवा करायची तर महाराजांची कर माझी नको. पण साहेब मला असे फुकट पैसे घेणे आवडत नाही. काम करून पैसे कमावणारा मी. ठेव ते पैसे तुझ्या हाताने कोणा गरजू व्यक्तीला तू दे असे म्हणून ती व्यक्ती पुढे निघून गेली. त्या व्यक्तीचे बोलणे शिवाला अस्वस्थ करू लागले. काय सेवा करू मी महाराजांची माझा अवतार पाहून मला कोणी मंदिरात जाऊ देईल का.? नको नको अपमान होण्यापेक्षा आपण बाहेरच थांबावं. गर्दी कमी झाल्यावरच आत जाऊ.! मंदिरात येणाऱ्या वाढत्या भक्तांची गर्दी बघून तो अचंबीत झाला होता. अबब.! किती हे मोठे भक्तगण. नक्कीच महाराजांच्या सेवेने काहीतरी कृपा केली असेल एवढे सगळे येतात इथे दर्शनाला. पुन्हा त्याचे लक्ष पादत्राणांच्या ढिगाऱ्याकडे गेले.

एका आजोबा केव्हापासून आपला एक पादत्राण हातात घेऊन दुसरे शोधत होता. तो तिथून उठला व म्हणाला दादा मी शोधून देऊ का तुमच्या पादत्राणांची जोडी.? सांगा बरं कशी होती? आणि आजोबांनी वर्णन केले. त्याने तशी 2-3 जोडी दाखवली. आजोबांनी हवा असलेला जोड पायात सरकवला. हात वर करून त्यांनी शिवाला आशीर्वाद दिला. शिवाला मनोमन आपण कोणाची तरी मदत करू शकलो याचे त्यांला समाधान वाटले. लहानपणापासून आपल्याला कामासाठी बोलणचं ऐकावे लागत होतं. पण आज निस्वार्थ मनाने आपण कोणाची तरी मदत केली आणि त्यांनी हात वर केला शिवाचे हे काम बघून बाकी लोकांना वाटले की तो इथला सेवेकरिचं असावा. तेही त्याला आपल्या पादत्राणांची जोडी शोधून देण्यास सांगू लागले. आणि तोही निस्वार्थ भावनेने प्रत्येकाला मदत करू लागला.

महाप्रसाद चालू झाला भक्तांची गर्दी जमली त्यांनी महाप्रसाद घेतला व आपल्या कामाला सुरुवात केली. पण त्याला घरी जायचे भांडण झाले नाही सायंकाळ झाली रात्रीचे नऊ वाजले. गर्दी ओसरत आली दिवसभराच्या दगदगीने तो थकला आणि तिथेच पायरीवर बसला. त्‍याची नजर समोर गेली कोणीतरी त्याला त्याच्या कडे येताना दिसले. रात्रीच्या वेळेस त्याला चेहरा ओळखता आला नाही जवळ येताच त्याने विचारले काय रे शिवा थकलास ? नाही म्हणत त्याने उठून त्याने आपुलकीने विचारलेल्या प्रश्नाने तो सुखावला. तुम्ही कसं ओळखता मला? अरे आपण परवा भेटलो नव्हतो का शेठजींच्या दुकानात.!

तुझा गठ्ठा उचलायचा भार कोणी कमी केला होता विसरलास? नाही जी.. पण तुम्ही माझी आठवणी ठेवली. शिवाच्या शब्दात आश्चर्य होते. आणि आपोआपच शिवाचे हात त्या व्यक्तीसमोर जोडले गेले. ते शिवाला म्हणाले थकला तर असशीलचं सकाळपासून भक्तांना सेवा देताना पाहिले आहे मी तुला निस्वार्थ मानाने तू भक्तांना सेवा देत होतास. त्यांची होणारी गैरसोय नकळतपणे तू लक्षात आणून दिलीस माझ्या. येतोस का येथे उद्यापासून सेवा द्यायला? पादत्राणे ठेवायला? लोखंडी स्टँड आणून ठेवू म्हणजे व्यवस्थित काम होईल. महिन्याचा पगार मिळेल आणि जेवणाची व्यवस्था होईल. येतोस? शिवा क्षणभर त्या व्यक्तीकडे बघतच राहिला.

दर्शन घेतले की नाही अजून प्रश्न ऐकून शिवा भारावून आला. आता मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची गरज वाटत नाही जी. म्हणत शिव आणि पुन्हा एकदा समोरच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन. दोन्ही हात जोडले आज तरी तू माझ्याकडे याचक म्हणून येशील. या अपेक्षा ने मी आशीर्वादासाठी हात वर करून ठेवला. पण तू कष्टालाचं देव मानलंस. आणि माझा हात तुझ्या साठी वरच्या वरच राहिला.
💐प्रचिती💐
ज्योती धनेवार- अलोणे

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!