Home / अध्यात्म / एका अनाथ मुलीने कधीकाळी बांधली होती राखी.. व्यक्तीने असे चुकविले राखीचे कर्ज, संपूर्ण जग करत आहे सलाम..!!!

एका अनाथ मुलीने कधीकाळी बांधली होती राखी.. व्यक्तीने असे चुकविले राखीचे कर्ज, संपूर्ण जग करत आहे सलाम..!!!

नमस्कार,

आज आम्ही तुम्हाला एका व्यक्तीबद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत,ज्या व्यक्तीच्या कौतुकाचे सगळे कौतुक करत आहे. प्रत्येक जण त्याच्याबद्दल चर्चा करत आहे. प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाबद्दल त्याला सलाम ठोकत आहे. प्रत्येकजण हेच म्हणत आहे की जर या देशांमध्ये अशा विचारसरणीचे लोक निर्माण झाले तर जगामध्ये सगळेच चांगले घडू लागेल.प्रत्येक व्यक्तीचे जीवन उज्वल होऊन जाईल… खरंतर आज आपण या लेखामध्ये अशाच एका साधारण पण असाधारण कार्य केलेल्या व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत..

या व्यक्तीचे नाव आहे हनुमंत तिवारी, ज्यांनी आपल्या कार्यातून समाजाला एक चांगला संदेश दिलेला आहे. हनुमंत तिवारी फक्त जनतेचे रक्षक च नाही तर हनुमंत हे अनेक अनाथ लोकांचे जनक सुद्धा झाले आहेत. आपणास ही गोष्ट माहिती नसेल की हनुमंत लाल तिवारी जेव्हा चर्चेमध्ये आले त्यांनी एका आपल्या मानलेल्या बहिणीचे लग्न खूपच धूम धडाका मध्ये केले होते आणि याच कार्यामुळे त्यांना विशेष ओळख सुद्धा प्राप्त झाली आणि समाजामध्ये त्यांचा सगळीकडे उदो उदो होऊ लागला..

या लेखामध्ये आम्‍ही जी माहिती तुम्हाला सांगत आहोत, ती माहिती उत्तर प्रदेश मधील लखिंपुर कसबाच्या सिकंदराबाद येथील आहे. या भागातील मूळनिवासी विचार त्रिवेदी यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. या निधनामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब अस्ताविस्ता झाले होते परंतु या अस्ताविस्ता झालेल्या कुटुंबाला त्याच भागातील पोलिस स्टेशनमध्ये प्रभारी अधिकारी असलेले हनुमंत लाल तिवारी यांचा आधार मिळाला. हनुमंत लाल तिवारी यांनी विचार त्रिवेदी यांच्या मुलीला आपली बहीण मानले आणि तिच्याकडून राखी सुद्धा बांधून घेतली. जेव्हा तिवारी यांनी या मानलेल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली त्यासोबत तिच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी सुद्धा आपल्या खांद्यावर स्वीकारली.

त्यानंतर हनुमंत लाल तिवारी मझगई चौकी चे थाना प्रभारी झाले परंतु एवढे झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी झटकली नाही त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सहमतीने दिवंगत त्रिवेदी यांची मुलगी अनिता हीचा विवाह खूपच धुमधडाकामध्ये केला. दिवंगत त्रिवेदी यांच्या पत्नी कमलेश त्रिवेदी यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी एका पुत्राप्रमाणे तसेच भावाप्रमाणे शिवधनुष्य पेलले आहे. हनुमंत अनिताच्या साखरपुड्याला सुद्धा गेले होते.

लग्नाचा संपूर्ण खर्च हनुमंत यांनी उचलला होता. एवढे सगळे करून सुद्धा अनिता यांच्या लग्नामध्ये एका भावाप्रमाणे सर्व पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याचे कार्य सुद्धा हनुमंत लाल यांनी पार पाडले. हनुमंत लाल यांच्यामते दिवंगत त्रिवेदी यांचे कुटुंब अतिशय गरीब आहे, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्रिवेदी यांच्यानंतर त्यांच्या मागे त्यांची पत्नी सोबत तीन मुली व एक लहान मुलगा, असे छोटे कुटुंब आहे. मुलगा एवढा लहान आहे की तो अद्याप आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारू शकत नाही. थाना प्रभारी हनुमंत म्हणतात की, ते कुठेही असू दे. जेवढे शक्य होईल तेवढे कोणत्याही परिस्थितीमध्ये या कुटुंबासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहतील.

आपल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत नेहमी राहिलेले तिवारी.
आपणास सांगू इच्छितो की, हनुमंत लाल तिवारी आपल्या चांगल्या कार्यामुळे नेहमी चर्चेत राहिले आहे. सध्याच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहेत त्याचबरोबर सोशल मीडियामधून सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्याच्या दिवसांमध्ये त्यांनी एका जंगलाच्या आजूबाजूला फिरणाऱ्या एका वृद्ध आईला तिच्या कुटुंबासोबत भेट घडवून दिली.

त्यांनी केलेल्या कार्याचे सुद्धा सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात आले होते. मझगई चौकीचे अधिकारी हनुमंत लाल तिवारी यांची नजर या भटकणाऱ्या महिलेवर पडली नंतर त्यांनी विचारपूस करून तिची चौकशी केली परंतु वृद्ध असल्याने फारशी काही माहिती त्या महिलेकडून मिळाली नाही त्यानंतर हनुमंत यांनी खूप चौकशी व अन्य प्रयत्न करून कुटुंबियांची माहिती काढली आणि कुटुंबीयांसोबत या वृद्ध महिलेची भेट घडवून आणली व त्यासोबतच या वृद्ध महिलेचे उपचार करून मोठ्या प्रमाणावर मदत सुद्धा केली.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!