Home / आरोग्य / एका महिन्यात 10 किलो वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या घरगुती सोपे उपाय..

एका महिन्यात 10 किलो वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या घरगुती सोपे उपाय..

सध्या वर्षभराच्या लॉकडाऊन मुळे खुप लोकांच्या पोटावर चरबी तैयार झाली आहे,पोटावरील चरबी ही शरीरासाठी घातक असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे चरबी वाढते परंतु काही खास सवयी अश्या आहेत, ज्याचा अवलंब केल्याने आपण कोणत्याही आहाराशिवाय पोटाची चरबी कमी करू शकतो.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण वर्कआउट करणे आणि आहाराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. हे केल्यावर पण, जर आपल्या पोटावरील चरबी कमी होत नसेल तर आपण खाली नमूद केलेल्या पद्धतींचा अवलंब करू शकता.

● साखर खाणे टाळा:-
वजन कमी करण्यासाठी आहारात साखर घेणे बंद करा. याशिवाय कोल्ड्रिंक्स आणि गोड पेयांमध्ये जास्त प्रमाणात साखर असते, त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपण पॅक केलेला रस ऐवजी ताजे रस प्या. या व्यतिरिक्त आपल्या आहारात हर्बल टी, ग्रीन टीचा समावेश करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

● ब्लॅक कॉफी प्यावी :
दिवसातून एकदा तरी विना दूध आणि विना साखरेची कॉफी प्यावी यामुळे वजन कमी होण्यास मदत होतो.दूध किंवा साखर नसलेली ब्लॅक कॉफी घेतल्यास आपल्या पचन क्रियेची गती वाढते आणि त्यामुळे चरबी नष्ट होण्यास मदत होते.आणि यामुळे वजन घटते असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, या कॉफीत साखर अजिबात टाकू नये, नाही तर ब्लॅक कॉफीचा काहीही परिणाम होणार नाही.

● आहारात प्रोटीनचा समावेश करा:-
आहारात योग्य प्रमाणात प्रोटीनचा समावेश केल्याने पोट अधिक काळासाठी भरलेलं राहतं आणि सारखी सारखी भूक लागत नाही. नाश्त्यामध्ये प्रोटीन फूड घेतल्याने तुम्ही अनहेल्दी आहारापासून स्वत:चा बचाव करु शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, दही, होल ग्रेन, अखरोड, भिजवलेला सुकामेवा, मोड आलेली कडधान्य, डाळी, ताजी फळे या पदार्थांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण या पदार्थांमधून मिळणारे प्रोटीन आपला स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात. फायबरमुळे पोट भरलेले राहते व भूक लागत नाही. यामुळे वजन कमी होण्यास भरपूर मदत होते.

● नियमित शारीरिक व्यायाम करा:-
व्यायाम हे वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा भाग आहे. जो पोटा वरील चरबी कमी करण्यास देखील मदत करतो. विशेषत: व्यायाम हे स्नायूंना पिळदार बनवण्यास मदत करतो. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!