Home / आरोग्य / दिवसभरात फक्त एकदा प्या हे पाणी जीवनभर पित्ताचा त्रास होणार नाही. सोबतच वाढलेले वजन देखील कमी होईल.

दिवसभरात फक्त एकदा प्या हे पाणी जीवनभर पित्ताचा त्रास होणार नाही. सोबतच वाढलेले वजन देखील कमी होईल.

दिवसभरात फक्त एकदा प्या हे पाणी जीवनभर पित्ताचा त्रास होणार नाही. गॅस, अपचन, करपट ढेकर कायमचे बंद होतील. सोबतच वाढलेले वजन देखील कमी होईल.

सध्या आपण सर्वजण घेत असलेल्या आहारामुळे पित्त, अपचन, गॅसेस ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींचा आहार हा खूप कमी असूनही वजन मात्र वाढत आहे. त्याच प्रमाणे पित्तासाठी रोज गोळी घ्यावी लागत असेल, cough नेहमी वाढत असेल तर आजचा उपाय अत्यंत महत्त्वाचा असून एक वेळ नक्की करा. सोबतच या उपायाने पोट झटपट साफ होते. आणि खाल्लेले कोणतेही पदार्थ पचतात. आणि पोटाची चरबी चरबी कमी होते.

त्याचप्रमाणे गुडघेदुखी कमी होण्यास देखील मदत होते. अशा या चमत्कारीक उपायाची पद्धती महत्त्वाची असून यात कोणते पदार्थ वापरले, त्याचे प्रमाण किती असावे? हे सांगितले जाईल. त्यामुळे आपल्याला त्याचा योग्य परिणाम मिळेल. हा उपाय अगदी सोपा आणि परिणामकारक आहे. हा उपाय आयुर्वेदातील महान ग्रंथ सार्थ शारंगधर सहिता या ग्रंथातील असून, याचा वापर पित्त आणि कफ कमी करण्यासाठी खूप जुन्या काळापासून केला जातो.

यासाठी जो आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे जव. याला जव/ जवा/ यव/ जौ अशी नावे आहेत. ज्या व्यक्ती गव्हाची शेती करतात त्यांना जवां विषयी नक्कीच माहिती असते. अशा या जवा एक प्रकारचं तण म्हणून गव्हात उगवतात. आणि हे अत्यंत उपयुक्त आहे. या वनस्पतीला इंग्रजीमध्ये Malting barley असे म्हणतात. तर याचे शास्त्रीय नाव Syn Hordeum Sativum Pers असे आहे. हे तुम्हाला किराणा दुकानात सहज उपलब्ध होते.

अशा या जवा आपल्याला एक वेळेचा उपायासाठी साधारणतः दोन चमचे घ्यायचा आहेत. आता या जवा चांगल्या भाजून घ्यायचा आहेत. या जवांमध्ये Phosphoric Acid व Lysine असते. जी वजन वाढू देत नाही वजन कंट्रोल करते त्याच प्रमाणे शरीरात अतिरिक्त तयार होणारे व चरबी जाणून ती कमी करण्याचं काम हे दोन घटक करतात. तसेच या जवांमध्ये Salicylic Acid, Potassium Calcium मोठ्या प्रमाणात असते. जे सांधेदुखी कमी करून हाडे मजबूत करतात. परिणामी गुडघे दुखी पाठ दुखी या समस्या कमी होतात.

हे जसे भाजायला लागतील तसे फुगतात व जाड होतात. या जवांमध्ये जो Lysin नावाचा घटक असतो तो पित्त, गॅस पूर्णपणे कमी करतो.

ज्यांना वजन खरच कमी करायचा आहे त्यांनी गव्हाच्या पोळी ऐवजी जवाची पोळी जवाची कणीक वापरली तर चांगला परिणाम पडतो. अशा या भाजलेल्या जवा थोड्याशा वाटून घ्याव्या आणि पाखडून त्यावर असणारा कोंडा काढून घ्यायचा आहे. कोंडा काढून झाल्यावर ते आपल्याला शिजवायचे आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या वाटून त्यावरील जो कोंडा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता या जवा आपल्याला शिजवायचे आहेत. शिजवण्याची एक पद्धती आहे. यामध्ये अस आहे जेवढ्या जवा घेतल्या आहेत त्याच्या 14 पट पाणी घ्यायच आहे. म्हणजे जर आपण एक चमचा जवा घेतल्या तर चौदा चमचे पाणी घ्यावे. आता या मिश्रणात आपण दोन चमचे जवा घेतल्या आहेत म्हणून 28 चमचे पाणी घ्यावे लागेल.

या पाण्यामध्ये आपण भाजलेल्या जवा होत्या त्या टाकून शिजवून घ्यायच्या आहेत. शिजू इतक्याच द्यायचा आहेत की जेणेकरून त्या म‌ऊ झाल्या पाहिजेत. आणि त्याचा जो अर्क आहे तो पाण्यात उतरला पाहिजे. त्यासाठी हे पाणी साधारणतः अर्धे होईल किंवा त्यापेक्षा कमी होईल. हे शिजल्या नंतर ते पाणी गाळून घेऊन ते वापरायचे आहे.
या मिश्रणातून जे सार तयार होणार आहे, किंवा जे शिल्लक राहणारे पाणी आहे याला आयुर्वेदात एक विशिष्ट नाव आहे. या पाण्याला आयुर्वेदात “वाट्यामंड” हे नाव असून हे आपण दिवसभरात केव्हाही घेऊ शकतो. याला कोणतेही बंधन नाही. सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण ग्रहण करू शकतो. याने पित्त विकार पूर्णपणे कमी होतो. शरीरातील कफ विकार देखील कमी येतो. याला कोणताही साईड इफेक्ट नाही. चवीसाठी यात थोडे सेंधळ मीठ टाकले तर चव चांगली लागते.

दोन दिवसात याचा परिणाम चांगला दिसेल हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे. म्हणजे आपली जी समस्या आहे ती मुळापासून संपेल.ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी हे सलग दोन महिने घ्यावे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!