सध्या हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकदा थंडीमुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. वातावरणामध्ये अनेकदा बदल होतो तसेच अनेक शारीरिक बदल सुद्धा आपल्याला जाणवायला लागतात, त्यातील एक बदल म्हणजे आपल्या पायांना भेगा पडणे,आपले तळवे आग मारणे यासारख्या समस्या अनेकदा आपल्याला होतात. या समस्या उद्भवण्याच्या मागे वेगवेगळी कारणे सुद्धा असतात.
बहुतेक वेळा आपण अनवाणी चालत असो किंवा जमिनीत वरील धूळ पायाला लागल्यामुळे सुद्धा या भेगा पडत असतात तसेच आपल्यापैकी अनेक जण दिवसभरातून कमी पाणी पितात आणि यामुळे आपल्या शरीराची त्वचा कोरडी होऊन जाते आणि यामुळेसुद्धा आणि पायांना भेगा पडण्याची शक्यता असते. हिवाळ्याच्या दिवसात आपण प्रत्येक जण आता चेहऱ्याची काळजी घेत असतोच पण त्याचबरोबर आपल्या अनेकदा पायाकडे दुर्लक्ष करत असतो म्हणून सगळ्यांनी पायाला पडलेल्या भेगांची काळजी घेणे गरजेचे आहे.
हा उपाय करण्यासाठी आपण मेणबत्तीचा वापर करणार आहोत.आपल्या घरामध्ये मेण असेल त्याचा वापर आपण सहज रित्या करू शकतो. सुरुवातीला आपल्याला तीन ते चार मेणबत्ती लागणार आहेत. या मेणबत्ती आपल्याला किसनी च्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहेत. अनेकदा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला फारशी तहान लागत नाही आणि म्हणूनच आपण पाणी सुद्धा पीत नाही हे कारण सुद्धा आपली त्वचा कोरडी होण्यासाठी कारणीभूत ठरते आणि यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ लागते. हा उपाय करताना आपण मेणबत्ती किसणीच्या सहाय्याने किंवा चाकूच्या साह्याने बारीक कापून शकता आणि मेणबत्ती आपल्याला बाजारामध्ये तसेच कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये सहजरीत्या उपलब्ध होऊन जाते.
हा उपाय करण्यासाठी आपण मेणबत्ती पावडर जास्त सुद्धा बनवून ठेवू शकतो आणि आपल्याला हवी तेव्हा आपण की गरम करून आपल्या पायांना लावुन ठेवु शकतो असं केल्याने तुमच्या पायाचे भेगा पूर्णपणे भरून निघतील आणि यामुळे पायांना नरिष्मेंट सुद्धा मिळते. हा उपाय करण्यासाठी आपण दुसरा पदार्थ वापरणार आहोत ते म्हणजे मोहरीचे तेल किंवा पॅराशुट तेल. जर तुमच्याकडे मोहरीचे तेल उपलब्ध नसेल तर अशावेळी तुम्ही खोबऱ्याचे तेल सुद्धा वापरू शकता.
आता एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचा मोहरीची तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे वॅक्स म्हणजेच मेण टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला ते पदार्थ एकजीव करून एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचे आहे आणि त्यामध्ये ही वाटी ठेवायची आहे म्हणजेच पातेले आपल्याला गॅस वर ठेवायचे आहे थेट वाटी गॅसवर गरम करायला ठेवायची नाही गरम पाण्यात व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर एका डबीत मेण काढून आपण आपल्या पायांच्या तळव्यांना हे लावायचे आहे,असे केल्याने तुमच्या पायाचा भेगा लवकरच दुर होणार आहे. हा उपाय साधारण पंधरा दिवस तरी करायचा आहे यामुळे पायाच्या भेगा पूर्णपणे दूर होऊन जाणार आहेत. तुमच्या पायांना कोमलपणा सुद्धा प्राप्त होईल म्हणूनच आपले पायाचे आरोग्य नैसर्गिक दृष्ट्या चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा.