सलमान खानसोबत काम केलेली ही अभिनेत्री लग्नाच्या 17 वर्षानंतरही आई बनू शकली नाही, अगदी चांगली कारकीर्द सुद्धा गमावली.

By | June 13, 2021

बॉलिवूडमधील 90 च्या दशकात एका अभिनेत्रीचे नाव खूपच चर्चेत होते, आणि ती अभिनेत्री म्हणजे आयशा झुलका. आयशा झुलका सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.मागे काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या दरम्यान तिने आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असतांना ही चित्रपटांच्या सृष्टीमधून एग्जिट का केले हे देखील सांगितले.

लग्नाचला 17 वर्ष झाल्या नंतरही ती आई का होऊ शकली नाही, याबाबत ही तिने खु-लासा केला आहे. या अभिनेत्रीने 1991 साली सलमान खानच्या फिल्म ‘कार्बन’ मध्ये देखील डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट झाल्याने तेव्हा आयशा ला एक नवीन ओळख मिळाली होती. यानंतर तिने मंसूर खान यांच्या दिग्दर्शनामध्ये बनत असलेली फ़िल्म ‘जो जीता वही सिकंदर’ यामध्ये आमिर खान सोबत काम केले होते.

आयशाने एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्याशी संबं-धित अनेक रह-स्ये उघडकीस आणली आहे. आयशाने सांगितले की तिने लहान वयातच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे तिला सामान्य जीवन जगायचे होते.त्यांच्या मते बॉलीवूडपासून दूर राहण्याचा त्यांचा निर्णय त्यांना योग्य वाटतो. मुलं नसल्याच्या बाबत ती म्हणाली की मला मुले नव्हते पाहिजे म्हणून मला मुले नाहीत.

त्या पुढे म्हणाल्या की, मी माझ्या कामामध्ये आणि सामाजिक कार्यात बराच वेळ आणि शक्ती वापरते आणि मला आनंद आहे की माझ्या संपूर्ण कुटुंबाने माझा या निर्णयाला समर्थन दर्शविला आहे. यासह तिने आपल्या पतीचीही खूप प्रशंसा केली.ती म्हणाली की, माझा नवरा एक चांगला माणूस आहे आणि माझ्या प्रत्येक निर्णयाचा तो आदर करतो. अभिनेत्री आयशा झुलकाने २००३ साली टाइकून समीर वाशीशी लग्न केले.

या मुलाखतीदरम्यान आयशाने काही चित्रपटांविषयीही माहिती दिली ,ज्यात आधी तर तिने चित्रपटाला नकार दिला पण नंतर तिला याचा पश्चाताप ही झाला. आयशा शुल्क यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रक मुळे मणिरत्न यांच्या रोजा या चित्रपटाला ही नकार दिला तसेच रमा नायडू यांच्या प्रेम कैदी ला ही नाकारल, कारण यात त्यांना बि-किनी वर काम करायच होत.

अभिनेत्री आयशाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर उडिया, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. कुर्बान, जो जीता वही सिकंदर, खिलाडी, मेहरबान, दलाल, बाल्मा, वक्त हमारा है, रंग, संग्राम आणि मासूम या चित्रपटात तिने उत्कृष्ट काम केले आहे. त्यांचा जन्म श्रीनगर येथे झाला. आज अभिनेत्री आयशा चित्रपटांपासून दूर अज्ञात आयुष्य जगत आहे, असे असूनही त्यांचे आयुष्य खूपच आरामदायक आणि ऐशोआराम चे आहे.

चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यानंतर आयशा व्यवसाय जगतात सक्रिय झाली आहे. आज आयेशा कोटींच्या मालमत्तेची मालक बनली आहे. अक्षय कुमारशीही त्याचे नाव जोडले गेले होते. दोघांचे अफेअर काही काळ चालले, त्यानंतर हे नाते फार काळ टिकले नाही आणि ब्रेकअप झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *