सध्याच्या आधुनिक जगात जगत असताना आपल्यातील कित्येकांना चष्म्याची समस्या आहे. म्हणजेच आपल्या डोळ्यांना चष्मा लागलेला असतो. यामागे अनेक कारणं आहेत, जसं की टीव्हीचा, लॅपटॉपचा, मोबाईलचा अतिरिक्त वापर करणे, मैदानावर न खेळता घरीच मोबाईलवर किंवा संगणकावर गेम्स खेळणे आणि इतरही काही.
काहींना चष्मा हा अनुवांशिक असतो तर काहींना नंतर आलेला असतो. आपल्यालाही जर कमी नंबरचा चष्मा असेल तर आपण तो एका घरगुती उपायाने घालवू शकतो. एवढंच नाही तर थकवा, अशक्तपणा, हाडांचा ठिसूळपणा, सांधेदुखीसारख्या इतरही समस्या आपण घालवू शकतो.
त्यासाठी आपल्याला खोबरे घ्यायचे आहे. खोबरे घरात आपल्याला आरामशीर मिळेल. योग्य प्रमाणात जर आपण नियमितपणे खोबरं खाल्लं तर आपल्याला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. आपल्याला खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. आपल्याला एक चमचा तीळ देखील घ्यायचे आहे.
शहरात असणाऱ्या जवळपास ६० टक्के व्याधी या पचनसंस्थेशी निगडित असतात. तर आपल्याला तिसरा महत्वाचा घटक घ्यायचा आहे जो आहे बडीशेप. शरीरातील अनावश्यक चरबी घालविण्यासाठी आपण बडीशेपचा उपयोग करू शकतो. आपल्याला एक चमचाभर बडीशेप घ्यायची आहे. तिन्ही पदार्थांचे अत्यंत बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे.
आपण तयार केलेल्या पावडरचा एक चमचा आपल्याला रोज घ्यायचा आहे. या उपायाचा वापर आपल्या घरातील कितीही वय असलेला व्यक्ती करू शकतो. दररोज सकाळ संध्याकाळच्या जेवणानंतर आपल्याला दुधात ही पावडर टाकून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला सांधेदुखी, चष्मा, रक्त कमी होण्याची समस्या अशा सर्व समस्यांपासून मुक्तता मिळणार आहे.