मनोज वाजपेयींच्या अभिनयाने बद्ध झालेल्या वेब सिरीज ‘फॅमिली मॅन’ च्या पहिल्या सीझननंतर आता दुसरा सीझन चर्चेत आहे. सोशल मीडियापासून ते रोजच्या बातम्यांपर्यंत ‘फॅमिली मॅन’ च्या दुसऱ्या सीझनचा उल्लेख सर्वत्र केला जात आहे. यावेळीही मनोज वाजपेयी श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत. दुसरीकडे, साउथ स्टार समंथा अक्केनेनी हिनेदेखील प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. पण तुम्हाला ठाऊक आहे का की या वर्षातील सर्वात लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक असलेल्या ‘फॅमिली मॅन 2’ मध्ये सहभागी असलेल्या अभिनेत्यांना या अभिनयासाठी किती फी दिली गेली? जाणून घेऊ या आजच्या लेखात.
१. शारीब हाशमी (जे के तलपदे)- ६५ लाख.
२. दर्शन कुमार (मेजर समीर)- १ करोड.
३. शरद केळकर (अरविंद)- १.६ करोड.
४. श्रेया धनवंतरी (झोया)- ७५ लाख.
या वेब सिरीजमध्ये अनेक अभिनेते नव्याने चर्चेत आले. त्यात प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती मिळाली ती, ‘चेल्लम सर’ साकारणारे अभिनेते ‘उदयभानू महेश्वरन’ यांना. त्याच बरोबर चेन्नई सारख्या भागात पहिल्यांदाच गेलेले श्रीकांत तिवारी आणि जेके तळपदे यांना साथ देणारा ‘मुथ्थु पंडियन’ म्हणजेच अभिनेते रवींद्र विजय. त्याचबरोबर अभिनेते अलगमपेरूमल (लंडन मधील भारताचे गुप्तहेर) यांनी दिपण नावाची भूमिका व्यवस्थित साकारली आहे. चेन्नई पोलीस ऑफिसर ‘उमा’ ही भूमिका देवदर्शीनी चेतन यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. दिवंगत अभिनेते असिफ बसरा यांच्या अभिनयाने त्यांची पुन्हा आठवण येतेच.
५. सनी हिंदुजा (मिलिंद)- ६० लाख.
६. आश्लेषा ठाकूर (धृती तिवारी)- ५० लाख.
७. मनोज वायपेजी (श्रीकांत तिवारी)- १० करोड.
८. समंथा अक्कीनेनी (राजी)- ४ करोड.
९. प्रियामनी अय्यर (सूची तिवारी)- ८० लाख.
बाकी काही असो मनोज वायपेजीच्या acting ला तोड नाही. गैंग ऑफ वासेपुरमध्ये केलेली सरदार खानची भूमिकाही उत्तम केली आहे. त्यानंतरची श्रीकांत तिवारी फॅमिली मॅन त्यांचा सर्व भूमिका मला आवडले आहेत. बाकी तुमचे मत कमेंट मध्ये कळवा.